Big Breaking : राज्य उत्पादन शुल्क पथकाची मोठी कारवाई ; तब्बल ६६ लाखांची विदेशी दारु जप्त..पुणे जिल्ह्यातील मोठी कारवाई..!!


नीरा : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज्य उत्पादन शुल्क पथकाने पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई केली असून या कारवाईत तब्बल ६६ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे.ही कारवाई पुरंदर तालुक्यातील नीरा येथे करण्यात आली.यामध्ये ६६ लाख रुपयांची तस्करी करण्यात येत असलेली दारुसह तब्बल ९१ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याप्रकरणी ट्रक चालक प्रवीण परमेश्वर पवार,वय.२३ वर्षे(रा.तांबोळे,ता.मोहोळ,जि. सोलापूर ) याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या अधिक माहितीनुसार,दि.१५ जुन २०२२ रोजी राज्य उत्पादन शुल्क पुणे अधिक्षक यांना मिळालेल्या गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती.पुरंदर तालुक्यातील नीरा गावच्या हद्दीत नीरा-लोणंद रोडवर हॉटेल न्यू प्रसन्ना समोरील रोडवर गोवा राज्यातून विक्री असलेल्या मद्याची वाहतूक होणार असल्याचे त्यांना समजले.

त्या अनुषंगाने नीरा गावच्या परिसरातील हॉटेल न्यू प्रसन्न समोरील रोडवर राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक क्रमांक २ पुणे विभागाने सापळा लावला.खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार भारत बेंज त्यांना दिसून आला हा ट्रक चालकास ट्रक रोडच्या कडेला घेण्याचा इशारा केला.त्यानंतर ट्रकची तपासणी केल्यावर त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्यसाठा व बिअरचा साठा मिळाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *