Pune Crime : मुंबईतील तरुणीची सोशल मीडियावर झाली ओळख ; जेजुरीला जाण्यासाठी बोलावून केला तरुणीवर बलात्कार..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

सोशल मीडियावर ऑनलाईन ओळखीनंतर जेजुरीला जाण्यासाठी बोलावून दोघांनी मुंबईतील तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी मुंबईतील एका ३० वर्षाच्या पीडित तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यावरुन पोलिसांनी संशयित आरोपी महेंद्र ऊर्फ रावसाहेब भानुदास गायकवाड (वय ४२,रा.मांजराईनगर,मांजरी) संतोष पाटील (वय ४०,रा. चिखली,कुर्डुवाडी ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादीची आरोपीसोबत ऑनलाईन ओळख झाली होती.आरोपींनी त्यांना ८ जून रोजी जेजुरी येथे जाण्यासाठी पुण्यात बोलवून घेतले.त्यांना कारमधून जेजुरीला घेऊन जात असताना संतोष पाटील याने भेकराई डेपो ते जेजुरी दरम्यान कारमध्ये वारंवार त्यांना मिठीत घेऊन किस केले त्यानंतर जेजुरी येथून परत आल्याने फिर्यादी यांना महेंद्र गायकवाड याने मित्राच्या घरी नेले.तेथे तिच्यावर बलात्कार केला.तसेच त्यांचे बरोबर अनैसर्गिक संभोग केला. त्यांच्या बरोबर संबंध न ठेवल्यास मारुन टाकण्याची धमकी दिली.या प्रकाराने फिर्यादी घाबरुन गेल्या होत्या.त्यानंतर त्यांनी आता पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *