नांदगाव : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
आईच्या मृत्यूनंतरबआईच्या सामाईक जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी २ हजार रुपये लाच घेताना नांदगाव येथील तलाठ्याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.युवराज रामदास मासोळे असे लाच घेताना पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई नांदगाव येथील तलाठी कार्यालयात सापळा रचून केली.
तक्रारदार यांच्या भाचीचे तिच्या आईच्या मृत्यूनंतर आईच्या नावावर असलेल्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर तिचे कायदेशीर नाव लावण्यासाठी युवराज मासोळे यांनी पाच हजार रुपये लाच मागितली. तडजोडी अंती ५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
नाशिक एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता युवराज मासोळे याने पाच हजार रुपये लाच मागून तडजोडीअंती दोन हजार रुपये घेण्याचे कबूल केले. त्यानुसार पथकाने सोमवारी (दि.१३) नांदगाव येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. तलाठी मासोळे याला तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रंगेहाथ
पकडले.युवराज मासोळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.