बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठीची आरक्षण सोडत बारामती नगरपरिषदेच्या सभागृहात जाहीर झाली.यामध्ये २० प्रभागातील ४१ जागांपैकी २१ जागा महिलांना राखीव ठेवण्यात आल्याने अनेक इच्छुकांचा मात्र हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले.बारामती नगरपरिषद हद्दीतील एकूण १,०८,१५२ लोकसंख्येपैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या २० हजार ३२६ आहे.
त्यानुसार अनुसूचित जातींसाठी आठ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. बारामती नगरपरिषद २०२२ च्या मुदत संपलेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण व सोडत १३ जून रोजी नगर परिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
बारामती नगरपरिषदेचे प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे…
प्रभाग क्र-१ – अ – अनुसूचित जाती महिला, ब – सर्वसाधारण,प्रभाग क्र-२-अ- सर्वसाधारण महिला – ब – सर्वसाधारण,प्रभाग क्र – ३-अ- सर्वसाधारण महिला,ब – सर्वसाधारण,प्रभाग क्र- ४ – अ- सर्वसाधारण महिला – ब -सर्वसाधारण
प्रभाग क्र -५ – अ- सर्वसाधारण महिला – ब- सर्वसाधारण, प्रभाग क्र – ६ अ- सर्वसाधारण महिला,- ब- सर्वसाधारण, प्रभाग क्र – ७ – अ सर्वसाधारण महिला – ब – सर्वसाधारण,प्रभाग क्र – ८ -अ – सर्वसाधारण महिला- ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र – ९ – सर्वसाधारण महिला – ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र – १० – अ – सर्वसाधारण महिला – ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र- ११- अ -सर्वसाधारण महिला- ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र – १२- अ – अनुसुचित जाती (महिला) ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र – १३ – अनुसुचित जाती (महिला) ब – सर्वसाधारण,प्रभाग क्र – १४ – अनुसूचित जाती – ब- सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र – १५ – अ सर्वसाधारण (महिला) – ब – सर्वसाधारण, प्रभाग -१६ – अनुसुचित जाती – ब – सर्वसाधारण (महिला),प्रभाग -१६ अ – अनुसुचित जाती – ब – सर्वसाधारण (महिला), प्रभाग -१७ -अ- सर्वसाधारण (महिला) – ब – सर्वसाधारण,प्रभाग -१८ – अ- अनुसुचित जाती – ब – सर्वसाधारण (महिला), प्रभाग -१९ -अ-अनुसुचित जाती ( महिला ) ब – सर्वसाधारण, प्रभाग – २० – अ – अनुसुचित जाती – ब – सर्वसाधारण (महिला) – क