भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
गोवंश जनावरांची कत्तल करून मांस वाहतूक करणारी इटिआस कार भिगवण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी संशयित आरोपी सलीम हबीब शेख,वय. ३९ वर्षे ( रा.रूम नंबर.२ जुहू गल्ली,वारलेस रोड,लोकसेवा कमिटीचे मागे,अंधेरी वेस्ट ) याच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४२९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५(क),९(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अंकुश महादेव माने,वय.३१ वर्षे यांनी फिर्याद दिली आहे.ही घटना पुणे सोलापूर महामार्गावर घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,भिगवण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी पुणे सोलापुर हायवेला पेट्रोलिंग करीत असताना,पोलिसांना मिळालेल्या
गोपनीय बातमीनुसार डाळज नं.१ चौकातुन पुण्याकडे एक इटिआस कार क्र.MH.02.EH.0659 मधुन जनावरांची कत्तल करून त्याचे मांस घेवुन निघाली आहे. बातमी मिळताच भिगवण पोलिसांनी तात्काळ मदनवाडी गावच्या हद्दीतील सकुंडेवस्ती येथे धाव घेतली. पुण्याकडे जाणारी टोयोटा कंपनीची इटिआस कार येताना दिसली.त्यावेळी या कार थांबवुन कारची तपासणी केली असता,कारमध्ये पाठीमागील बाजुस जनावरांच्या मांसांचे तुकडे भरलेले दिसले.
त्यावेळी चालकाकडे मांसाबाबत विचारपुस केली असता,त्याने हे इंदापुर तालुक्यातील कळस मधील जमिल कुरेशीने भरून दिले असुन ते विक्रीसाठी मुंबई येथे घेवुन चाललो आहे असे सांगितले.हे मांस हे गाई,म्हैस,वासरे,बैल यांचे असल्याचे चालकाने सांगितले. गाडीत तब्बल ३५० किलो गोमांस आढळून आले. पोलिसांनी ३५ हजारांचे गोमांस आणि ४ लाखांची इटिआस कार असा साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यातील गोमांस सॅम्पल हे केमीकल अनालायझर पुणे यांच्याकडे पाठविण्यासाठी ५०० ग्रॅम गोमांस पशुधन विकास अधिकारी यांनी सम्पल काढुन सिलबंद करून ठेवले आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास भिगवण पोलीस हे करीत आहेत.