१५ जूनला होणार राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन..
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामतीत ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स अंड इंनोवेशन अॅक्टिविटी सेंटर उभारण्यात आले आहे.या सायन्स अँड इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष शरदपवार यांच्या अध्यक्षतेखाली १६ जूनला होणार असून,या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर,उपमुख्यमंत्री अजित पवार,बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे,उद्योगपती गौतम अदानी,राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्यासह भारतातील सर्वात तरुण शास्त्रज्ञ गोपालजी यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती,यावेळी राजेंद्र पवार म्हणाले की, राज्यातील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी संधी देऊन त्यांच्यातील नवीन कल्पना विकसित केल्या जाव्यात यासाठी एक्सपोजर-एक्सपेरिमेंट एक्स्प्लोरेशन या “३ ई” तत्त्वावर सेंटर काम करणार असून शालेय विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान क्षेत्रातील नामांकित संस्थेमध्ये नेऊन विज्ञान बद्दलची आवड वाढवणे आणि संशोधन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम तसेच काही शाळांना प्रयोग साहित्याच्या किटचे वाटप आणि प्रशिक्षण दिले जाईल. आणि यासाठी ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत राजेंद्र पवार यांनी सांगितले.
तसेच भविष्यात विद्यार्थ्यांना एक केंद्रात उपलब्ध असणाऱ्या फन सायन्स गॅलरी,ॲग्रीकल्चर गॅलरी थ्रीडी थिएटर इनोवेशन हब, व्हर्चुअल रियालिटी,ऑगमेंटेड रियालिटी, यांसारखे तंत्रज्ञान पाहायला मिळणार असून जपान कोरिया चीन या देशांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाधिष्टित शिक्षण व्यवस्था असल्याने तेथील तरुण संशोधक ऑटोमोबाईल,टेलिकॉम,होम अप्लायन्सेस या क्षेत्रात भरीव प्रगती करत आहेत. यातून स्वदेशी उत्पादन करणारे भावी तंत्रज्ञ आणि संपूर्ण जगाला पुरवठा करतील आशा कंपन्या भारतात उभ्या करणारे उद्योजक तयार करण्याचा मानस देखील राजेंद्र पवार यांनी बोलून दाखवला.
शारदानगर कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात हे सेंटर उभारले असून या सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने १५ जून ते १७ जून पर्यंत राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले असून,या प्रदर्शनात जवळपास २५० वैज्ञानिक प्रकल्पाची नोंदणी झाली आहे. या प्रदर्शनात वेगवेगळ्या तज्ञ व्यक्तींचे सायन्स शो जादूचे प्रयोग विज्ञान कार्यशाळा स्टँड अप कॉमेडी अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी मुलांसाठी असेल तसेच या कार्यक्रमासाठी राज्यभरातून जवळपास ६००० विद्यार्थी आणि ६०० शिक्षक उपस्थित राहणार आहेत.हे सेंटर मिळण्यासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, संस्थेचे सल्लागार प्रा.संतोष भोसले,शारदाबाई पवार विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक श्री.सुर्यकांत मुंढे,सेंटरच्या व्यवस्थापक हीना भाटीया, प्रा.सोनाली सस्ते, प्रा.जया तिवारी यांनी आयोगासमोर आणि टाटा ट्रस्टच्या समितीसमोर सादरीकरण केले आणि ग्रामीण भागातील एक अद्ययावत सायन्स सेंटर बारामती येथे मंजूर झाले असल्याची माहिती राजेंद्र पवार यांनी दिली.
बातमी चौकट :
कोरोनाचे सावट असतानाही हे सेंटर केवळ २ वर्षांत बांधून पूर्ण केले गेले.हे सेंटर केवळ अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टपुरते मर्यादित राहणार नसून पुणे आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना याचा लाभ होण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा येथे तयार केलेल्या आहेत.
राजेंद्र पवार ( प्रमुख अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट )