Baramati Crime : भागीदारीत सोन्याचे दुकान टाकू असे म्हणत, जमिनीचे गहाणखत करण्याऐवजी खरेदीखत करत पतसंस्थेकडून काढले ३४ लाखांचे कर्ज ; चौघांवर फसवणूकीसह सावकारी कायद्यांन्वये गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

सुपे गावात भागीदारीत सोन्याचे दुकान टाकू असे म्हणत,व्याजाने दिलेल्या २५ लाखांच्या बदल्यात दरमहा ५ टक्के व्याजाने २५ लाख देत,५ एकर जमिनीचे गहाणखत करून देण्याचे ठरले असताना या जमिनीचे खरेदीखत करून घेत फसवणूक करण्यात आली.तसेच तीच जमीन पतसंस्थेकडे तारण ठेवत त्यावर ३४ लाखाचे कर्ज घेत फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात भा.द.वि कलम ४२०, ५०६,३४ सह महाराष्ट्र सावकारकी अधिनियमाचे कलम ३९,४५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रेखा चंद्रकांत चांदगुडे ( रा.सुपे,ता.बारामती, जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.सुमिता सुधाकर धर्माधिकारी (रा.सुपे,ता.बारामती) राजेंद्र साहेबराव जगताप (रा. खंडूखैरेवाडी,ता.बारामती), झुंजार पुंडलिक चांदगुडे (रा. दापोडी चौफुला,ता.दौंड) अप्पासाहेब विश्वास शिंदे (रा.अंतवाडी,ता.कराड,जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,फिर्यादी रेखा चांदगुडे यांच्या मुलाला सुपे गावात भागीदारीमध्ये सोन्याचे दुकान टाकू असे म्हणत खासगी सावकाराने व्याजाने दिलेल्या २५ लाखांच्या बदल्यात पानसरेवाडी हद्दीतील गट क्रमांक. ३४५ मधील पाच एकर जमीन गहाण ठेवत,गहाणखत करून देण्याचे ठरले असताना देखील या जमिनीचे खरेदीखत करून घेत फसवणूक करत,तीच जमीन पतसंस्थेकडे तारण ठेवत त्यावर ३४ लाखाचे कर्ज घेण्यात आले.तसेच या आरोपीने फिर्यादीस २५ लाख रुपये ५ टक्के व्याजाने देत,पाच एकर जमीन तारण ठेवली तरी देखील असता,आरोपीला २५ लाखांपेक्षा जास्त व्याज देऊनही अजून पैसे द्या,नाहीतर तुमच्याकडे बघून घेतो अशी धमकी दिली.२३ मार्च २०१५ ते ७ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत सुपे येथे ही घटना घडली.आरोपीने फिर्यादीची जमीन परत न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास करंजे दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार हे करीत आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *