Baramati Breaking : बारामतीत शासकीय महिला रुग्णालयातील डाॅक्टरांना व कर्मचाऱ्यांना शिविगाळ ; एकावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती येथील महिला शासकीय रुग्णालयात डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांना अश्लिल शिवीगाळ करत दमदाटी केल्याप्रकरणी संशयित आरोपी प्रदीप सुरेश नकाते (रा. प्रगतीनगर,ता.बारामती) याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम २९४,४२७,३५३ सह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ति आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.याप्रकरणी शासकीय रुग्णालयातील अधिपरिचारक अमोल नारायण जामकर वय.३२ वर्षे ( रा. देऊळगाव,ता.दौंड,जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी अमोल जामकर हे अपघात विभागात अधिपरीचारक म्हणून काम करतात.दि.०९ जून रोजी त्यांच्यासोबत डाॅ.प्रिया किसन हरिदास, जीवनज्योती डिसिल्व्हा हे ड्युटीवर असताना, यावेळी प्रदीप नकाते हे पत्नीला पोटात दुखत असल्याने तेथे उपचारासाठी घेऊन गेले.डाॅ. हरिदास यांनी तपासणी केल्यानंतर गरोदर असल्याने, रुग्णाची सोनोग्राफी करण्याची आवश्यकता आहे,तुम्ही सोनोग्राफी करून घ्या,त्यानंतर पुढील उपचार करता येतील.

यावेळी संशयित आरोपी नकाते यांनी महिला वैद्यकीय प्रिया हरिदास यांना,तु पेशटंवर उपचार करणार आहेस की नाही, इंजेक्शन देणार आहे की नाही, असे बोलत अश्लिल भाषेत शिविगाळ दमदाटी सुरु केली. यावेळी फिर्यादी जामकर यांनी तुम्ही मॅडम यांना शिविगाळ करू नको,असे सांगितले असता संशयित आरोपीने चिडून फिर्यादीलाही शिविगाळ करत त्यांच्या अंगावर धावून आले. हाॅस्पिटलमधील खुर्च्या फेकून दिल्या.टेबल व बेड पलटी करून नुकसान केले. वैद्यकीय अधिकारी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीने फिर्यादीत म्हटंले आहे.याप्रकरणी तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *