Baramati News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन बारामतीत उत्साहात साजरा..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

महाराष्ट्रभर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा “वर्धापनदिन” मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आज बारामती देखील राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये देखील मोठ्या उत्साहात बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर व शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांच्या हस्ते सकाळी १० वाजून २० मिनिटांनी ध्वजाचे आरोहण करून साजरा करण्यात आला.

याप्रसंगी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करून आलेल्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बारामती तालुका व शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका,कारखाने, पतसंस्था, सोसायटीचे चेअरमन, संचालक, सदस्य, नगरसेवक व ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच आणि सदस्य तसेच बारामती तालुका व शहरातील प्रमुख पदाधिकारी, युवक, महिला आणि पक्ष संघटनेतील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना,आपण २३ व्या वर्धापन दिनानिमित्त एकत्र आलो आहे केवळ वर्धापन दिन साजरा करून थांबायचे नाही तर थांबण्याची आगामी निवडणूक लढवायची आहे.त्यामुळे सर्वांनी पक्षवाढीसाठी संघर्षरत राहायचे आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *