तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने भाजप अनुसूचित जाती मोर्चाची आघाडी आक्रमक..
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
नुकतेच बारामती कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी युगेंद्र पवार यांची निवड करण्यात आलेली आहे.आणि आता याच निवडीवरून भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष मुकेश वाघेला यांनी युगेंद्र पवारांवर निशाणा साधला असून,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार यांची पवार कंपनीतुन अध्यक्षपदी निवड झाली असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष मुकेश वाघेला यांनी केला आहे.
या निषेधाचे पत्रक देखील वाघेला यांनी जारी केले असून यात वाघेला यांनी नमूद केले आहे की,तसे पाहायला गेले की, कुस्तीगीर संघटना ही अतिशय सन्मानाचा विषय असून, त्याठिकाणी अध्यक्षपदी एखाद्या पैलवान व्यक्तीचीच निवड होणे अपेक्षित आहे. परंतू तसे न होता
पवार कंपनीतून एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करून युगेंद्र पवार यांची निवड केलेली आहे. हा कुस्तीगीर संघटनेचा व पैलवान आणि कुस्ती शौकीनांचा मोठा अपमान असल्याची टीका त्यांनी केली आहे.
तसेच वाघेला यांनी युगेंद्र पवारांना आवाहन केले असून, युगेंद्र पवारांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एकतरी कुस्ती केलेली असेल,तर त्याचा फोटो किंवा प्रमाणपत्र किंवा लंगोटीवर कुस्ती खेळलेला किमान एकतरी फोटो सादर करावा आणि हे शक्य नसेल तर माझ्या सारख्या सामान्य नागरीकांबरोबर बारामतीकरांच्या साक्षीने कुस्ती खेळण्यासाठी तयार रहावे आणि हे सर्व मान्य नसेल तर आपण नैतिकता बाळगून या पदाचा राजीनामा देवून एखाद्या कुस्तीगीराला सन्मानाने स्वहस्ते अध्यक्ष पदाची जबाबदारी दयावी.असे देखील वाघेला यांनी या पत्रकात नमूद केले आहे.यामुळे आता तालुका कुस्तीगीर संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष युगेंद्र पवार या पत्रकावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.