Baramati News : बारामतीचे प्रसिध्द सोनोग्राफी तज्ञ डॉ.सतीश पवार यांना व्याख्यान देण्यासाठी स्पेन येथे आयोजीत केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमंत्रण..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

१ ते ४ जून या कालावधीत स्पेन येथील ‘टोलीडो’ या शहरात आयोजीत केलेल्या मस्क्युलॉस्केलेटल अल्ट्रासाउंड सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बारामतीचे प्रसिद्ध सोनोग्राफी तज्ञ डॉ. सतीश पवार यांना व्याख्यान देण्यासाठी आमंत्रीत करण्यात आले होते. या जागतिक परिषदेस ३० देशातील सोनोग्राफीतज्ञ उपस्थित होते.गुढग्यातील कुर्चा व त्यांना होणाऱ्या इजा यांची अल्ट्रासोनोग्राफी या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले.या क्लिष्ट अशा विषयावर व्याख्यान देणारे सोनोग्राफी तज्ञ जगात दुर्मिळ आहेत.

त्यामुळे डॉ. सतीश पवार यांनी केलेले गुढग्याच्या सोनोग्राफीचे सादरीकरण जगभरातील सोनोग्राफी तज्ज्ञांमध्ये औत्सुक्याचा विषय ठरले व सर्व उपस्थित डॉक्टरांनी हे तंत्र शिकून घेण्यासाठी पुढाकार दर्शविला. या व्याख्यानासोबतच गुढग्याच्या सोनोग्राफी विषयक शोधनिबंध डॉ.सतीश पवार यांनी डॉ.सम्राज्ञी व डॉ. कीर्ती पवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्पेन येथे सादर केला. २०१६ साली स्नायू, नसा व हाडांची सोनोग्राफी म्हणजे ‘मस्क्यूलोस्केलेटल अल्ट्रासोनोग्राफी’ भारतात विकसित होण्यास स्पेन व अमेरिकेतील डॉक्टरांनी मदत केली व भारतातील काही निवडक डॉक्टरांनी याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. यात वर नमूद केलेल्या सर्व डॉक्टरांबरोबर बारामतीच्या डॉ सतीश पवार व डॉ कीर्ती पवार यांचा समावेश होता.

गेल्या सहा वर्षात भारतातील या निवडक डॅाक्टरांनी हे तंत्रज्ञान खुप वेगाने आत्मसात केले व जगाच्या नकाशावर तीस देशातील सोनोग्राफीतज्ज्ञांमध्ये हे सर्व सोनोग्राफी तज्ञ आज अग्रेसर ठरत आहेत, ही भारतीयांसाठी अत्यंत अभिमानस्पद गोष्ट आहे.या परिषदेसाठी दिल्ली येथील डॉ.निधी भटनागर, मुंबई येथील डॉ. मोहित शाह, डॉ. अंकित शाह, पुणे येथील डॉ. जोबन बाभूळकर व गुहाटी येथील डॉ. जीना डेका या सोनोग्राफी तज्ज्ञांनाही व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *