बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा किराणा मालाच्या आड विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना, शहर पोलिसांनी बारामती विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मिशन हायस्कूलजवळ पकडण्यात आला. या कारवाईत तब्बल १३ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक यशवंत ज्ञानदेव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी संतोष गायकवाड व एका अज्ञात इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना गुटख्याची अवैध वाहतूक करणारा आयशर मिशन हायस्कूलजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली होती,त्यानुसार पोलिसांनी संशयावरून अशोक लेलंड क्र.MH.12.QG.8872 या गाडीजवळ गेले असता,गाडीतील दोघेजण पोलिसांना पाहताच मिशन हायस्कूलच्या कंपाउंडवरून उडी टाकत पळून गेले.पोलीस स्टाफने त्यांचा पाठलाग केला,त्यावेळी आवाज देवूनही ते अंधाराचा फायदा घेवून तेथून पळून गेले.पोलिसांनी अशोक लेंलड टेम्पोची पाहणी केली असता सर्व पिशव्यांमध्ये गुटखा मिळून आला.त्यामध्ये तब्बल ११,०८,८०० रुपयांचा गुलाम गुटखा आणि २,००,००० रुपयांचा अशोक लेलंड टेम्पो असा एकूण १३,०८,८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते,बारामती पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, सहाय्यक मुकुंद पालवे,प्रकाश वाघमारे,पोलीस नाईक यशवंत पवार,पोलीस कर्मचारी चव्हाण,गौरव ठोंबरे,अंकुश दळवी,कांबळे यांच्या पथकाने केलेली आहे.