Daund News : कानगावच्या आदर्श विद्यालयाचा १००% निकाल..!!


पाटस : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

दौंड तालुक्यातील कानगाव येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १२ वी चा निकाल १००% लागला आहे . संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आज इयत्ता १२ वी चा निकाल जाहीर झाला आहे .कानगाव येथील आदर्श विद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला आहे.

विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक गवळी वैभव गोरख (८५.५०% ) द्वितीय क्रमांक चौधरी निकिता परशुराम (८४%) तर तृतीय क्रमांक गवळी वर्षा संदीप (८३.६७ % पटकावला आहे.आदर्श विद्यालयाचा कला शाखेचा निकाल १००% लागला आहे . कला शाखेत प्रथम क्रमांक भगत मनोज शरद (७९.६६% ) द्वितीय क्रमांक अडसूळ गणेश दत्तात्रय ( ७५.६७) तर तृतीय क्रमांक शेख सानिया अकबर (७४.५०%) यांनी मिळवला आहे .

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन,संचालक विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले . याबाबत विद्यालयाचे शिक्षक कुलदीप यादव यांनी माहिती दिली .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *