Baramati Breaking : पोलीस पाटील पदासाठी खोटा जन्माचा दाखला देणे पडले महागात ; शहर पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पोलीस पाटील भरती जन्मतारखेचा खोटा व चुकीचा दाखला देत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कानडवाडीच्या महिला पोलीस पाटील विद्या मारुती उर्फ हनुमंत कोळेकर ( रा.कानाडवाडी,चोपडज,ता. बारामती, जि.पुणे ) या महिले विरोधात शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४२०,४६८,४७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी बारामती शहराचे मंडल अधिकारी महंमद पापा सय्यद,वय.५२ वर्षे (रा.फलटण, रोड,मारुती शोरूम पाठीमागे, बारामती ) यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार विजय पाटील यांनी दिलेल्या अधिकृत पत्रानुसार सय्यद यांनी फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,सन २०१७ साली पोलीस पाटील परीक्षेवेळी जन्माचा खोटा दाखला पोलीस पाटील परीक्षेसाठी वापरला.अशी स्थानिक ग्रामस्थांनी तक्रार केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तहसीलदार विजय पाटील यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते, याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याला याप्रकरणी चौकशी सुरू होती आणि वडगाव निंबाळकर पोलिसांनी याबाबत सविस्तर अहवाल तहसीलदारांना पाठवला होता

या अहवालात त्यांनी विद्या कोळेकर यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे दिलेला जन्माचा दाखला विवाहापूर्वी विद्या सतीश करे या नावाने दिला होता.१९९१ सालचा जन्माचा दाखला सादर केला होता,व तो दाखला खोटा व बनावट असल्याचा अहवाल वडगाव निंबाळकर पोलिसांनी तहसीलदार विजय पाटील यांना सादर केला असून,या सर्व कागदपत्राची पाहणी केली असता,विद्या मारुती उर्फ हनुमंत कोळेकर यांची जन्मतारीख १९९३ अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील
गणेशवाडी झाल्याचे निष्पन्न झाले.पोलीस पाटील पदासाठी परीक्षेसाठी वयाची अट पुर्ण करण्यासाठी शासनाची फसवणूक करत चोपडज ग्रामपंचायतकडील खोटा व बनावट दाखल देत शासनाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *