बिग ब्रेकिंग : तब्बल ४० लाखांच्या गुटखा प्रकरणात; सहा ‘डीबी’च्या पाेलीस कर्मचाऱ्यांच निलंबन..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

अमरावती येथील परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास जुने शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील किराणा बाजाराजवळच्या ट्रकमधून गुटख्याचा माल उतरवित असताना,छापा घालून तब्बल ४० लाखांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला.या प्रकरणात पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी कामात कसूर केल्यामुळे जुने शहर पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

या कारवाईमुळे अकोला पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे.जुने शहरातील किराणा बाजारपेठेत गुटख्याची साठवणूक करण्यात येत असल्याची माहिती अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना मिळाली होती.त्या आधारावर त्यांच्या पथकाने ट्रकमधून ४० लाखांचा गुटखा उतरताना जप्त केला. यावेळी आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले होते. याप्रकरणी जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यातील सहा जणांना निलंबित करण्यात आले आहे.दरम्यान या प्रकरणात जुने शहर डीबी स्कॉडने कसुरी केल्यामुळे पथकातील सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.यासोबत जुने शहर ठाणेदार,एलसीबी प्रमुख आणि जिल्हा पोलिस अधीक्षक पथक यांचाही कसुरी अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे.दरम्यान या कारवाईमुळे अकोला पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *