बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती शहर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराने मुलाचे अपहरण करून मारून टाकण्याची धमकी देत महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना घडली घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी रोहित केशव जगताप, वय. २८ वर्षे (रा.कसबा,ता.बारामती) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३७६, ४२७,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बारामती मधील पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
याबाबात सविस्तर माहिती अशी की, बारामती मधीलच एका महिलेच्या मुलाचे अपहरण करण्याची धमकी देत तिला कोणी जवळचे नातेवाईक नाही हे पाहून मोरगाव रोडच्या सिकंदरनगर भागात घेऊन जात त्याठिकाणी काटेरी झुडपांमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एवढे होऊन देखील या नराधमाने त्याची शारीरिक भागवण्यासाठी पीडिता ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी येऊन परत त्या ठिकाणी गोंधळ घालत,त्यांची इच्छा पूर्ती करण्याची मागणी परत केली तिला त्याने नकार दिला असता तिच्या घरी जाऊन तिच्या घराची तोडफोड केली.
पीडित महिलेने कोणतीही तमा न बाळगता शहर पोलीस स्टेशन गाठून आपल्याव लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस ठाण्यात सांगितले.संशयित आरोपी रोहित जगताप याला ताब्यात घेतले असून, न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने संशयित आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते,पोलीस उपअधीक्षक बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक,पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील उपनिरीक्षक युवराज घोडके,पोलीस हवालदार शिंदे, इंगळे यांनी केलेली आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.
बातमी कोट :
कोणत्याही महिलेने कुणाविरुद्ध ही लैंगिक अत्याचाराची तक्रार केल्यास,आरोपीवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.