बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती व इंदापूरमधील एका डेअरीची संगनमताने तब्बल २० लाख ६८ हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी संशयित आरोपी पवन पठारे (रा.गलांडवाडी नं.१,ता. इंदापूर,जि.पुणे ) शरद महादेव गेजगे (रा.गोखळी,ता. फलटण,जि.सातारा), उमेश खुळपे (रा. घेर्डी,ता.सांगोला जि.सोलापूर) व बंडू लेंडवे (रा.आंधळगाव,ता. मंगळवेढा, जि.सोलापूर) यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४०८,४२०,४६७,४६८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.याबाबत दोन्ही डेअरीचे व्यवस्थापक सुशांत ज्ञानदेव शिर्के (रा.पाटस रोड, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,२० ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान हा प्रकार घडला असल्याचे फिर्यादींनी महंटले आहे.फॉम्युन डेअरी इंदापूर येथील वजन काट्यावर पवन पठारे हा ऑपरेटर म्हणून काम करत होता.शरद गेजगे हा टॅंकर चालक तर शिवांश दूध डेअरीचे खुळपे हे मालक आणि बंडू लेंडवे हे अनिता लेंडवे दूध डेअरीचे मालक आहेत.फॉर्म्युन डेअरी ही रियल डेअरीची उपकंपनी आहे.या डेअरीचे सर्व व्यवहार रिअल डेअरी मधून होत असतात.२६ फेब्रुवारी २०२२ रोजी बारामती एमआयडीसी येथील कंपनीच्या व्यवहाराचे रजिस्टर पाहणी करत असताना,फिर्यादीला त्यात बऱ्याच ठिकाणी खाडाखोड दिसली.
त्यावरून त्यांनी वजन काटा ऑपरेटर पठारे यांना विचारणा केली असता,त्याने रजिस्टर मध्ये खाडाखोड केली नसून ती रजिस्टर लिहीत असताना चुकून त्याच्याकडून खाडाखोड झाल्याचे सांगितले.परंतु फिर्यादीला त्याच्यावर संशय आल्याने सर्व वजन काटे चेक केले असता,त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून आली.फिर्यादीनी कॉम्पुटर साॅफ्टवेअर तपासले असता दूध टॅंकरच्या वजन काट्यात फेरफार झाल्याचे दिसून आले.त्यामुळे पुन्हा पठारे याच्याकडे चौकशी केली असता त्याने गेजगे यांच्या ओळखीचे खुळपे, लेंडवे यांच्या डेअरीवरून येणाऱ्या दूधाच्या वजनात फेरफार करून आम्ही संगनमताने फसवणूक केल्याचे सांगितले. या घटनेत बारामती व इंदापूरमधील प्रमुख डेअऱ्यांची सुमारे २० लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.असे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.