बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यातील सांगवी येथील एका महिलेशी सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित करताना त्याचे व्हिडीओ फोटो काढत भेटण्यास नकार दिल्याने काढलेले फोटो व व्हिडिओ व्हाॅट्सअप स्टेटसवर ठेवल्याप्रकरणी संशयित आरोपी लक्ष्मण मच्छिंद्र वीर (रा. रांजणगाव,ता.पैठण,जि औरंगाबाद ) याच्यावर भा.द.वि कलम ५००,५०६ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ चे कलम ६७ (ब) नुसार बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सांगवीतील २६ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, संशयित आरोपींची बहीण पीडित फिर्यादींच्या शेजारी राहात होती.सप्टेंबर २०२१ मध्ये फिर्यादीची ओळख वीर याच्याशी बहिणीकडे राहायला असताना झाली. फिर्यादींचे पती कामावर गेल्यानंतर आरोपी त्यांच्या घरी गप्पा मारण्यासाठी येऊ लागल्याने,यातूनच आरोपीने पीडितेशी गोड बोलत,तिचा मोबाईल नंबर घेत,तिच्याशी फोन द्वारे मेसेज करू लागला.त्यानंतर गणपती विसर्जनाच्या दिवशी पती कामावर गेल्याचे पाहून आरोपीने पीडितेबरोबर सहमतीने वारंवार तिच्या राहत्या घरी,लाॅजवर शरीरसंबंध प्रस्थापित केले.त्यावेळी त्याने व्हिडीओ व फोटो काढले.फेब्रुवारी २०२२ मध्ये आरोपीचे काम गेल्याने तो त्याच्या मूळ गावी औरंगाबाद येथे गेला.
त्यानंतर त्याने कॉल करत पीडितेला पणदरे येथील मयुरी लाॅजवर भेटायला बोलावले असता,पीडितेला त्याच्याशी कोणतेही संबध ठेवायचे नसल्याने तिने भेटण्यास नकार दिला.त्यावेळी आरोपीने महिलेला ब्लॅकमेल करण्यासाठी आपल्या मोबाईलमधील काढलेले नग्न फोटो महिलेच्या व्हाट्स अपद्वारे पाठवत,फोन करून पीडितेला धमकी देत,तू जर भेटायला आली नाही,तर मी हे फोटो तुझ्या नवऱ्याला व भावाला पाठवीन अशी धमकी दिली.हा प्रकार घडल्यानंतर पीडितेने हा प्रकार नवऱ्याला सांगितला.त्यानंतर काही वेळाने त्याने तिच्यासोबतच्या संबंधाचा व्हिडीओ तिला पाठवला,तरीही फिर्यादीने त्याला भेटण्यास नकार दिल्याने २७ मे रोजी आरोपीने स्वतःच्या व्हाॅट्सअप स्टेटसला दोघांचे नग्न अवस्थेतील फोटो ठेवले.पीडितेने त्याचा स्क्रीनशाॅट काढत,पोलिसांत धाव घेतली.आरोपीने दोघांचे नग्न फोटो व्हिडिओ पाठवत माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने मोबाईलवरून प्रसारित केली असे फिर्यादींने फिर्यादीत महंटले आहे.