बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यातील तहसील कार्यालयात पुरवठा विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांने कोट्यावधींची उलाढाल केल्याच्या पत्रकाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले असताना,या पत्रकामधून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे.या सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या या पत्रामुळे बारामती तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.एकंदरित आता या सोशल मीडियावर फिरत असलेल्या पत्रकाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आणि बारामती तहसीलदार यांच्या माध्यमातून चौकशी होणार का ? आणि या पत्रकाचा खुलासा होणार का ? असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे.
व्हायरल झालेल्या या पत्रकामध्ये बारामती पुरवठा प्रशासनातील एका अधिकाऱ्याने आपल्या पत्नीच्या नावावर तब्बल ७० लाख रुपयांची मोक्याच्या जागेची खरेदी केली असल्याचा दावा सोशल मीडियावर पत्रक टाकून बारामती तालुक्यातील सुपे गावातील सुरेश भोसले पाटील या व्यक्तीने केला आहे.यामुळे बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.या पत्रकामध्ये भोसले यांनी असे म्हटले आहे की, बारामती पुरवठा प्रशासनातील हा अधिकारी भूकंपग्रस्त पोटार्थी म्हणून नोकरीस लागलेला आहे. व आजतागायत केवळ वीस वर्षात तब्बल ४ कोटी रक्कमेच्या स्थावर व जंगम मालमत्तेच्या संपत्तीचा मालक झाला या बाबीचे चिंतन अभ्यास अनुकरण इतरांनी करण्याचे गरज आहे.तसेच प्रशासनातील गुरुतुल्य मार्गदर्शक म्हणून एका व्यक्तीचे नाव देत त्या व्यक्तीला देखील सुरेश भोसले पाटील यांनी धन्यवाद दिले आहे.
या प्रशासनातील अधिकाऱ्याने हे आर्थिक ज्ञानाचे गणित मा.गृहमंत्री अनिल देशमुख व खासदार भावना गवळी यांना व इतर जो कोणी ईडीच्या रडारवर असतील त्यांनी त्यांची सुटका करण्यासाठी या बारामतीच्या चमत्कारिक अधिकाऱ्यांची भेट घेऊन मार्गदर्शन व आशीर्वाद द्यावेत असे देखील भोसले यांनी म्हंटले आहे. तसेच बारामती तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांनी फक्त टाळ्या वाजवत बसावे असे देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रकात भोसले यांनी आवर्जून नमूद केले आहे.यामुळे या पत्रकाची दखल जिल्ह्याचे कार्यक्षम जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख घेणार का ? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
बातमी कोट :
मला कुठलं पत्रक आहे ते माहिती नाही,मला ऑफिशली कोणतेही पत्रक मिळालेलं नाही.किंवा या पत्रकाबाबत मला वरिष्ठांकडून विचारणा केल्यास, त्याबाबत चौकशी करून मी उत्तर देईल,असे बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले आहे.