Gopichand Padalkar Speak : आमदार गोपीचंद पडळकरांची रोहित पवारांवर सडकून टीका ; म्हणाले “रोहित पवारांची लायकी”..पहा काय म्हणाले पडळकर..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांवर सातत्याने टीका करण्यात येत आहे.शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादी असल्याचा आरोप देखील गोपीचंद पडळकर करत असताना त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना खोचक टीका केली होती.“घरात जसं शेंबड्या पोराला मोठी माणसं आवरतात,तसं भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी गोपीचंद पडळकरांना आवरायला हवं”,असं रोहित पवार म्हणाले होते.

यावर आता गोपीचंद पडळकर यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. पडळकरांनी रोहित पवारांवर टीका करतानाच शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे. यावरून आता पडळकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “राज्यात नेमकं मोठं कोण ? रोहित पवारांना हा प्रश्न विचारला पाहिजे.तुमच्या घरातल्या कुणालाच मी मोठं मानत नाही. आधी आजोबा आणि नातवानं हे ठरवलं पाहिजे. आमच्या महापुरुषांचा इतिहास तुम्ही पुसायला निघाले आहात. त्याचं उत्तर तुम्ही राज्यातल्या जनतेला दिलं पाहिजे.आजोबांनी जेजुरीत भाषणात काय म्हटलं ? जिथे रोहित पवार नेतृत्व करत आहेत,तिथे अहिल्यादेवींचा जन्म झाला. म्हणजे तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे झाले का ?” असा सवाल पडळकरांनी केला आहे.

“चौंडीचा कार्यक्रम तुम्ही घ्यायची गरजच नव्हती. तिथे तुम्ही उघडे पडलात. त्या कार्यक्रमात शरद पवार म्हणतायत की अहिल्यादेवींच्या पावलावर पाऊल ठेऊन रोहित पवार काम करतोय. “रोहितला अजून शेंबुड काढायचा कळतो का” ? तुम्ही अहिल्यादेवींसोबत तुलना करायला चालले आहात. त्यामुळे मला आवरायचं सोडा. गेल्या ७० वर्षांत तुम्हाला आवरायला कुणी नव्हतं. तुम्हाला आवरायचं काम मी करतोय. तुम्ही आता पूर्णपणे उघडे पडले आहात”, अशा शब्दांत पडळकरांनी टीका केली आहे.

“रोहित पवारांची अजून लायकी नाहीये. आजोबांनी त्यांना सादर करायचं,अहिल्यादेवींचा कार्यक्रम हायजॅक करायचा इतक्या लेव्हलचे, लायकीचे तुम्ही नाही. आता हे लोकांना कळालं आहे. चौंडीतला कार्यक्रम आटोपता का घ्यावा लागला ? रोहित पवारांनी कार्यक्रम घ्यायचा काही संबंध नाही. तुमच्या आजोबांना ८२ वर्ष झाली, तुम्हाला कधी अहिल्यादेवींची जयंती दिसली नाही. तुम्ही कार्यक्रम घेताय, मग आम्ही काय मेलोय का ?” असा सवाल देखील पडळकरांनी केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *