Baramati Crime : बारामतीतील सराईत गुन्हेगार माऊली काशीद वर्षासाठी स्थानबद्ध ;एमपीडीए कायद्यान्वये १५ जणांवर कारवाईचे प्रस्ताव तयार..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत आरोपी सुरज उर्फ माऊली सोमनाथ काशीद,वय.२६ वर्षे ( रा.मेडद,ता.बारामती,जि.पुणे ) याच्यावरती बारामती तालुक्यातील बारामती तालुका पोलीस स्टेशन,बारामती शहर पोलीस स्टेशन,वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे तब्बल १३ गुन्हे दाखल होते.त्यामध्ये भा.द.वि कलम ३०७ प्रमाणे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत.

अनेक गुन्हे दाखल होऊन देखील हा व्यक्ती गुन्हेगारी थांबवत नसल्याने त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण साहेब व बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे साहेब यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्यामार्फत एमपीडीए कायद्याअंतर्गत या गुन्हेगारास एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता,त्यास मान्यता मिळाल्याने या सराईत आरोपीला एका वर्षासाठी येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.बारामती तालुका पोलिसांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबत आणखी ६ सराईतांचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत.तसेच बारामती उपविभागातून तब्बल १५ जणांचे प्रस्ताव एमपीडीए कायद्याअंतर्गत पाठवण्यात आले असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते,बारामती विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण,पोलीस अंमलदार राम कानगुडे पोलीस हवलदार सुरेश दडस,पोलीस नाईक बापू बनकर अमोल नरूटे,रणजीत मुळीक,पोलीस कर्मचारी प्रशांत राऊत,नितीन कांबळे यांनी केली आहे.

बातमी चौकट :

उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी आवाहन केले आहे की जर एखादा गुन्हेगार शरीरा विरुद्ध चे गुन्हे, मालमत्ते विरुद्ध चे गुन्हे, किंवा अवैध धंद्या बाबत असणारे गुन्हे करण्याचे थांबत नसेल तर त्याच्यावरती एमपीडीए कायद्याअंतर्गत कार्यवाही करून त्यास याच प्रमाणे सुमारे एका वर्षासाठी येरवडा कारागृह येथे स्थानबद्ध केले जाईल याची दक्षता घ्यावी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *