या प्रकरणात पुणे ग्रामीणचे कार्यक्षम पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख कारवाई करणार का ? नागरिकांकडून चर्चेला उधाण…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यात लाचलुचपत विभागाच्या गेल्या सहा महिन्यात तीन ते चार कारवाया झाल्या असून,यामध्ये काही पोलिस अधिकाऱ्यांचा व पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.नुकतेच काही दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांच्यावर मानव मिसींग गुन्ह्यातील मोबाईल तपासणी प्रकरणात पन्नास हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पानसरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.गेल्या पंधरा दिवसांपूर्वी देखील बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी उगले व होमगार्ड सनी गाढवे यांच्यावर आठशे रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे.
असे असताना बारामती तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना कशाचीच भीतीच राहिली नाही काय असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एवढ्या कारवाया होऊन देखील चक्क पोलीस कर्मचारी फोन वरती पैशांची मागणी करतो आणि ते देखील वरिष्ठांच्या नावाखाली..साहेब पैसे घ्यायला नको म्हणत्यात.तरी पण मी लावतो घ्यायला पैसे..यामुळे आता या प्रकरणात केवळ पोलिस कर्मचाऱ्यांवरच कारवाई होणार का ? की त्या साहेबांवरती पण कारवाई होणार ? पुणे ग्रामीण पोलीस दलातील कार्यक्षम पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख काय कारवाई करणार हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.या प्रकरणातील एक ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडिया वरती प्रचंड व्हायरल होत आहे.
यामध्ये एक पोलीस कर्मचारी समोरच्या व्यक्तीला म्हणतोय की, साहेब काय पैशाला काय नकोच म्हणत्यांत मी दोन तीन दिवस झालं साहेबांना विचारतोय.. पण साहेब पैशाला नकोच म्हणत्यात. तरी पण आपण बळच देऊ म्हणायचं..मी साहेबांनी घ्यायला लावतो म्हणजे कसं पैसे घेतले म्हणजे ते आपोआपच ते आपल्याला सूट देतील आपल्याला…साहेबांना मी विचारलं आहे..पण साहेब पैशाला नकोच म्हणत्यांत.. कशामुळे काय माहित म्हणत्यात… यावेळी यातील दुसरी व्यक्ती मी आमच्या पाहुण्यांकडे देतो.यावेळी यातील पोलीस कर्मचारी म्हणतो, मी साहेबांकडे पैसे देऊन ठेवतो, साहेबांच अस म्हणणं आहे की, जर वरच्या साहेबांनी जर दाखल करायचं न्याट लावलं तर,मग आहे असे रिटर्न केले जातील पैसे..
त्यामुळे आता या प्रकरणात या पोलीस कर्मचाऱ्यांवर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कारवाई करणार का ? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे बारामती तालुक्यात पोलीस प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे,दिसून येत आहे त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकरणात लक्ष घालून या भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देणार का ? हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणात काही सामाजिक संघटना या संदर्भात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करणार असून या प्रकरणात पाठपुरावा देखील करणार असल्याचे त्यांच्याकडून बोलले जात आहे.