Baramati Crime : तरुणीकडून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी; विवाहित तरुणाच्या आत्महत्याप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

लग्नानंतरही एका तरुणीबरोबर अनैतिक संबंध ठेवत, घरातील विरोधानंतर त्याने तिच्याशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी तिने संबंध तोडले तर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन सर्वांना जेलमध्ये टाकीन,अशी धमकी दिल्याने एका विवाहित तरुणाने घरी साडीने गळफास आत्महत्या केली.याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी एका तरुणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी आमिर काझी यांच्या पत्नीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अमिर शकुर काझी,वय.३० वर्षे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आमिर काझी याला दोन मुली असून तो दुचाकी दुरुस्तीचे काम करत होता.त्याचे एक वर्षांपासून एका तरुणीसोबत अनैतिक संबंध होते.अमीर हा तिच्या घरी जात होता.या सर्व प्रकाराला त्याच्या घरातून विरोध होता त्याच्यामुळेच त्याच्या आईने त्याला वेगळे रहायला सांगितले होते.गेल्या काही दिवसांपासून तो तिच्याशी संबंध तोडण्याचा प्रयत्न करीत होता.त्यामुळे तो तणावात होता.

पत्नीने त्याला विचारले असता “तू माझ्याशी संबंध तोडले तर मी तुझ्यावर व तुझ्या घरच्यांच्या विरुद्ध पोलिसांकडे बलात्काराची तक्रार दाखल करील व तुला व तुझ्या घरच्यांना जेलमध्ये टाकीन.तुमच्या घरच्यांच्या सर्वांच्या नावची चिठ्ठी लिहून आत्महत्या करेल,”अशी वारंवार धमकी देत असल्याचे त्याने पत्नीला सांगितले. त्यामुळे तिने मला फोन करुन बोलाविल्यानंतर मला जावे लागते,असे त्याने सांगितले. १९ मे रोजी अमीर मोबाईलवर मोठ मोठ्याने बोलत घरी आला.त्याने खोलीला आतून कडी लावून घरातील लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *