धक्कादायक बातमी ! सासवडमध्ये दोन भिकाऱ्यांची हत्या झाल्याचं गंभीर प्रकरण उघडकीस,एका हॉटेल चालकाने उकळते पाणी अंगावर ओतून केला दोघांचा खून,एक महिला गंभीर जखमी…घटना दाबल्याची दबक्या आवाजात नागरिकांत चर्चा…!!


सासवड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात माणुसकीला काळीमा फासण्याची घटना घडली असून,कचरा वेचून आपले पोट भरणाऱ्या भिक्षेकरूना गुंड हॉटेल चालक पप्पू उर्फ निलेश जयवंत जगताप या हॉटेल चालकाने बेदम मारहाण करत, अंगावर उकळतं पाणी टाकून त्यांचा खून केला केला असल्याची घटना घडली असून, यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि शेवंताबाई जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे.ही घटना २३ मे ला घडली असून प्रशासनाने हासगळा प्रकार दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला अशी दबक्या आवाजात सासवड शहरात चर्चा देखील सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,सासवड शहरात भिक्षेकरी हे जगताप यांच्या हॉटेलजवळ असलेल्या अहिल्यादेवी मार्केटच्या ओसरीवर बसत होते. त्याचा राग मनात धरून जगताप यांनी या तिघांना काठीने मारहाण केली.या मारहाणीत भिक्षेकरी जागेवर तडफडत असल्याने ते भिक्षेकरी अजून कसे गेले नाहीत म्हणून जगताप याने त्याच्या हॉटेलमधील गरम पाणी भिक्षेकरीच्या अंगावर फेकले.यात तिन्ही भिक्षेकरी पूर्णता भाजून निघाले.

तर शेवंताबाई जाधव,वय.६० वर्षे यांचा हात भाजला तर दोन वयोवृद्वयोवृद्धाचा नराधम जगताप याने खून केला असल्याची सासवड शहरात जोरदार चर्चा सुरू असून, या घटनेनंतर ३६ तास त्याठिकाणी मृतदेह निपचीत तडफडत पडले होते.दरम्यान ही घटना पोलीस सासवड पोलिस ठाण्याच्या जवळच असलेल्या घटनास्थळी घडली.मात्र यावेळी पोलिसांनी ढुंकूनही पाहिले देखील पाहिले नाही.हा सगळा प्रकार स्थानिक नागरिकांनी पाहून उघडकीस आणला आहे.यामुळे आता सासवड पोलीस प्रशासन गुंड प्रवृत्तीच्या हॉटेल चालक जगताप याच्या वरती काय कारवाई करणार याकडे सासवड करांचे लक्ष लागून राहिले आहे.या प्रकरणात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील लक्ष घालून कारवाई करण्याचे आदेश देणार का ? गुंड प्रवृत्तीच्या हॉटेल चालक जगताप याला पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणार का ? असा प्रश्न आता सासवडकरांकडून उपस्थित केला जातो आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *