Gopichand Padalkar Speak : पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला,त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘आहिल्यानगर’ करण्याची गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..!!


मागणीच्या प्रश्नांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला…

सांगली : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा, अशी मागणी भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. हे आवाहन करताना त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. तुम्ही काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही, हे दाखवून द्या, असंही पडळकर म्हणाले. दोन ते तीन दिवसांपूर्वीच अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी आणि पडळकर आमनेसामने आले होते.त्यानंतर हे आवाहन करण्यात आलं आहे. याबद्दल बोलताना पडळकर म्हणाले, “जेव्हा हिंदुस्तानातल्या मुसलमान राजवटीत हिंदू संस्कृती,मंदिरं फोडली जात होती,तेव्हा हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी याच हिंदू संस्कृतीत प्राण फुंकले, मंदिरांचा जिर्णोद्धार केला.

म्हणून सर्व अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे की, ज्या भूमीत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे अहमदनगर नाव बदलून ते अहिल्यानगर असे करावे, असं पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. या शहराचं नामांतराचा तात्काळ निर्णय़ घेऊन तुम्ही दाखवून द्या की तुम्ही काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही. तुम्ही मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा आणि होळकरशाहीचा सन्मान करा. ही आपल्याकडून अपेक्षा आहे”.

शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर पत्रात म्हणतात, “नुकत्याच पार पडलेल्या अहमदनगरमधल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा पुतण्याच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडीत येण्यापासून रोखलं.शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्या बहिणीचे आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लाँच करण्याचा इव्हेंट वाटतो.”

बातमी कोट :

महाराष्ट्रात हे आताच होत आहे का,याअगोदर देखील नामकरणाच्या मागण्या झालेल्या आहेत.औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामकरणाची मागणी आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मागणी करण्याचा अधिकार आहे.ज्या महापुरुषांची नामकरण मागणी होते,ते सर्वच वंदनीय, आदरणीय व्यक्ती आहेत.मात्र कुठले प्रश्न महत्वाचे आहेत हे महत्वाचे आहे.मात्र इतर देखील प्रश्न महत्त्वाचे आहेत.याबरोबरच त्या गोष्टींला आपण महत्त्व देने गरजेचे आहे.या नामकरणाच्या मागणीतून आपण काय मिळवणार आहोत,आणि काय लोकांना मेसेज देणार आहोत,यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांनी याचा विचार गरजेचं आहे. एकंदरितच या त्यांच्या वक्तव्यावरुन त्याचा नामकरण प्रश्नाला अप्रत्यक्षपणे या विषयाला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.

अजित पवार ( उपमुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *