बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामतीमध्ये टाईम फॉर इंडिया या नावाने शेअर प्रॉडक्ट करणारी कंपनी स्थापन करून चांगल्या प्रकारे नफा कमवून देतो,त्यामध्ये संचालक म्हणून घेतो असे सांगून विश्वास संपादन करत बहीण संशयित आरोपी दीपाली सदाशिव भिसे हिच्या अकाऊंट वर पैसे मागवून घेत एकाची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपी सदाशिव भिसे (मूळ.रा.रेडणी,ता.इंदापूर,जि. पुणे) यांच्यासह बहिणीवर देखील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तुषार ओंबासे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,तक्रारदार ओंबासे यांची नवीनच ओळख संशयित आरोपी बरोबर झाली होती.आरोपीने ओंबासे यांना सांगितले की,त्याची टाईम फॉर इंडिया या नावाने शेअर प्रॉडक्ट करणारी कंपनी असून,या कंपनीत संचालक म्हणून घेतो व चांगल्या प्रकारे नफा कमवून देतो.असे म्हणत तक्रारदारांचा विश्वास संपादन करत,सन २०२० ते २१ या दरम्यान आरटीजीएस ऑनलाइन पद्धतीने तब्बल ६२ लाख ५७ हजार ९७३ रुपये घेत गंडा टाकला.तसेच संशयित आरोपीने हे पैसे त्याची बहीण आयसीआयसी बँकेत कामाला असणारी तिच्या नावावर मागून घेतले होते.
पैसे अकाउंटवर घेतल्याने संशयित आरोपीची बहिण दिपाली सदाशिव भिसे हिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.संशयित आरोपी हा स्वतः ची ओळख लपवण्यासाठी पुण्यात लपून- छपून स्वतःचा पत्ता बदलून राहत होता.तक्रारदारांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तपासाला वेग आला आणि भल्या पहाटे संशयित आरोपीला पुण्यातुन अटक केले. तपासात निष्पन झाले की, आरोपीने पैसे काढून टाकलेले दिसत असून या प्रकारची कुठलीही कंपनी अस्तित्वात नाही.या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दांडिले हे करीत आहेत.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दांडीले, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे पोलीस शिपाई तुषार चव्हाण,अजित देवकर यांच्या पथकाने केलेली आहे.