महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
तक्रारी अर्जावरुन गुन्हा दाखल न करण्यासाठी ७० हजारांची लाच स्विकारताना खार पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकला मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.स्वप्निल बबनराव मासळकर,वय-35 वर्षे असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून यांच्याकडून लाचेची तक्रारदार रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले.याबाबत तक्रारदार यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल मासळकर याच्या विरुद्ध खार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खार पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मालकीच्या इमारतीला मुंबई महापालिकेकडून धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावली आहे.त्यामुळे फिर्यादी यांनी इमारतीच्या आजूबाजूस लोखंडी पत्रे लावले आहेत.यामुळे इमारतीमधील दुकानदारांना दुकानामध्ये ये-जा करण्यासाठी बेकायदेशीर प्रतिबंध होत असल्याची तक्रार दुकानदारांनी खार पोलीस ठाण्यात दिली आहे.
तक्रारी अर्जावरुन गुन्हा दाखल करण्यासाठी स्वप्निल मासळकर याने तक्रारदार यांच्याकडे ८० हजारांची लाच
मागितली.तडजोडीअंती ७० हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी मुंबई एसीबीकडे तक्रार केली.एसीबीच्या अधिकाऱ्यांनी २८ मे रोजी पडताळणी केली असता आरोपी स्वप्निल मासळकर याने ७० हजार रुपये स्विकारण्याचे कबुल केले. त्यानुसार सोमवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून ७० हजार रुपये लाच स्विकारताना स्वप्निल मासळकर याला रंगेहाथ पकडण्यात आले.