Jejuri News : जेजुरीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्याला मुंबई बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पावलेल्या हिंदूच्या रक्ताने माखलेले हात लागल्याने दुग्धाभिषेक : आमदार गोपीचंद पडळकर


जेजुरी : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

अमावस्येच्या निमित्ताने गोपीचंद पडळकर जेजुरीत आले होते.अहिल्याबाई होळकर यांची २९७ वी जयंती आज पार पडत आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजकारण करीत असल्याचा आरोप देखील गोपीचंद पडळकर यांच्याकडून केला गेला.१९९३ बॉम्बस्फोटात सहभाग असणाऱ्या आणि शेकडो हिंदूंचा खून करणारे आज सत्तेत बसल्याचा आरोप त्यांनी केला.

जातीयवादी लोकांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण केलं.त्यामुळे आम्ही अहिल्यादेवींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करणार असल्याची घोषणा पडळकरांनी केली. तसेच पुतळ्याचे शुद्धीकरण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.पडळकरांनी पुन्हा एकदा पवारांना टार्गेट करत धनगर समाज यशवंत होळकरांच्या किल्ल्याची मागणी करत असल्याचं म्हटलं.

मात्र, शरद पवार हा किल्ला फुकट वापरत असल्याचा आरोप पडळकरांनी केलाय.शरद पवारांनी होळकरांच्या जमिनी ढापल्या. काठेवाडीच्या जमिनीचे मिळालेले पैसे होळकरांच्या कुटुंबाला मिळाले नाहीत. ते पैसे सुद्धा पवारांनीच ढापले असून होळकरांच्या जमिनीवर यांचा डोळा आहे, असा गंभीर आरोप पडळकरांनी केलाय.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *