मोठी बातमी ! माता न तू वैरीणी ! आईने केली पोटच्या सहा मुलांची हत्या ; मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्‍न..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

महाड तालुक्यातील ढालकाठी गावात एका आईने पाच मुली आणि एका मुला विहिरीत ढकलून त्यांचा जीव घेण्याची हृदयद्रावक घटना आज सायंकाळी घडली.या मुलींना विहिरीत ढकलल्यानंतर या महिलेनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.नवऱ्याबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून महिलेने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.रुना चिखुरी सहानी (वय.३० वर्षे) असे या महिलेचे नाव आहे.

रोशनी चिखुरी सहानी वय.१० वर्षे , करिष्मा चिखुरी सहानी वय.८ रेश्मा चिखुरी सहानी वय ६ , विद्या चिखुरी सहानी वय ५ , शिवराज चिखुरी सहानी वय ३ आणि राधा चिखुरी सहानी वय दिड वर्ष अशी मृत मुलांची नावे आहेत.पाच मुली आणि एका मुलाला आधी विहिरीत ढकलून दिले आणि त्यांनतर तिनेदेखील उडी मारली. मात्र याचवेळी जवळच्या आदिवासीनी तीला पाहीले आणि विहिरीतुन बाहेर काढले आणि वाडीत आणले. यावेळी तीन हकीकत सांगितल्यानंतर सर्वांंना धक्का बसला.रात्री दहा वाजे पर्यंत चार मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.

पोलिसांसह महाडचे आमदार घटनास्थळी जातीने उपस्थित आहेत. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.महिलेचा जीव वाचला असला तरी सहा लहान मुलांचा नाहक जीव गेला आहे. सदर कुटूंब परराज्यातील असून ते ढालकाठी येथे उदरनिर्वाह करण्यासाठी आल्याचे समजते. दरम्यान, या घटनेमुळे महाडमध्ये खळबळ उडाली आहे.
 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *