जेजुरी : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
अखंड महराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेनिमित आज जेजुरी गडावरून पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले.लाखो भाविकांनी यावेळी देवदर्शनासाठी गर्दी केली होती.पालखी सोहळा जेजुरी गडावरून निघताच हजारो भाविकांनी भंडाराची उधळण करून येळकोट येळकोट जयमल्हारचा जयघोष केला. आज सकाळी अकरा वाजता जेजुरी गडावरून पालखी सोहळ्याचे मानकरी पेशवे यांनी आदेश देताच श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा सुरु झाला.
यावेळी जेजुरी गडावर पालखी सोहळ्याने प्रदक्षिणा पूर्ण केल्या नंतर श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आल्या यावेळी हजारो भाविकानी भांडाराची उधळण करून येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला.जेजुरी गडावरून बानुबाई मंदिर मार्गे ऐतिहासिक छत्री मंदिर,जानुबाई मंदिर मार्गे सोहळा कऱ्हा स्नानासाठी कऱ्हानदीकडे रवाना झाला.