Baramati Breaking : “लबाड लांडग ढोंग करतंय,अन मी हिंदू असल्याचं सोंग करतंय “गोपीचंद पडळकरांची नाव न घेता पवारांवर जहरी टीका..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जन्म स्थळापासून “जागर अहिल्या युगाचा,जागर पराक्रमी इतिहासाचा” या तीनदिवसीय यात्रेची सुरुवात करून बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक,पणदरे,माळेगाव उंडवडी, कण्हेरी या गावात अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांचा जागर केला. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आपल्या समाजातील इतिहास पोहोचला पाहिजे या भावनेतून ही रथयात्रा काढल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. याचे औचित्य साधत बारामती तालुक्यातील ढेकळवाडी या ठिकाणी आयोजित केलेल्या अहिल्यादेवी जयंती उत्सवाच्या ठिकाणी गोपीचंद पडळकर बोलत होते.

यावेळी गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांवर टीका करण्याची संधी देखील सोडली नाही.यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, पवारांचे तुम्ही सोंग आता लोकांना कळायला लागले आहे.त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये पवारांनी अशा काही भानगडी करायला जाऊ नये, कारण आता पवारांना आम्ही हिंदू आहे हे सांगावं लागतं आहे.आम्ही हनुमानाच्या मंदिरांमध्ये आमच्या निवडणुकीचा नारळ फोडतो.हे पेपर मधून छापुन आणावं लागत.हे टीव्ही चॅनेल वरती तुम्हाला दाखवावं लागत.याच्यापेक्षा शरमेची दुसरी कुठली गोष्ट असू शकत नाही.असा घणाघाती आरोप देखील पडळकरांनी पवारांवर केला.यावेळी दादा कोंडके यांचं गाणं म्हणतं “लबाड लांडग डाँग करतंय..अन लगीन करायचं सॉंग करतंय..पण आता त्याच्यामध्ये बदल झाला असून, “लबाड लांडग डाँग करतंय..अन मी हिंदू असल्याचं सॉंग करतंय.”पण हे सोंग आता महाराष्ट्रातील सगळ्या तरुणांना कळालं आहे.अस देखील पडळकरांनी आवर्जून सांगितले.

यावेळी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके,पुणे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद देवकाते,भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे,तालुका उपाध्यक्ष सुधाकर पांढरे यशवंत ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष बाबुराव सोलनकर, युवा मोर्चाचे अजित मासाळ, जगदीश कोळेकर, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अर्चना पाटील राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल सातकर,रंजन काका तावरे, संपतराव टकले,वसंत घुले,अंकुश ठोंबरे,दशरथ राऊत माऊली हळणवर,जी.बी.आण्णा गावडे,पुरुषोत्तम ढोणे, बापूसाहेब मेटकरी,अभिजित देवकाते भालेराव झारगड, अविनाश मासाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *