Baramati Gopichand Padalkar : बहुजनांच्या इतिहासाचे लचके तोडण्याचे मोघल प्रवृत्तीच्या पवारांचे प्रयत्न ; बारामतीत गोपीचंद पडळकरांचा थेट पवारांवर हल्लाबोल..!!


कन्हेरीत होणाऱ्या शिवसृष्टीत सुबोनजी देवकाते यांचे स्मारक व्हावे,गोपीचंद पडळकरांची मागणी…

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

“जागर आहिल्या युगाचा,जागर पराक्रमी इतिहासाचा”या तीन दिवसीय यात्रेची सुरुवात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थोरले सुभेदार मल्हारराव होळकरांच्या जन्म स्थळापासून रथयात्रा येऊन केली.त्यानंतर गोवोगावी जात पडळकरांनी अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर केला.समाजाला आपला मूळ इतिहास माहिती असावा आणि त्या इतिहासाची कल्पना नवीन तरुण मुलांना मिळावी यासाठी आम्ही या यात्रेचं आयोजन केलं असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

यावेळी पडळकर बारामती तालुक्यातील कन्हेरी या गावातील मारुतीचे दर्शन घेण्यासाठी आले असता, छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार म्हणून ओळखले जाणारे सुबोनजी देवकाते यांच्या समाधीशी छेडछाड केली असल्याची तक्रार स्थानिकांनी आमदार गोपीचंद पडळकरांच्या कानावर घातली.यावेळी कन्हेरीत पत्रकारांशी बोलताना पडळकर म्हणाले की, शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी काही मोजके सरदार उपस्थित होते, त्यामध्ये सरदार सुबोनजी बळवंतराव देवकाते हे उपस्थित होते.निष्ठा निभावन काय असतं हे ज्यांनी स्वराज्याला दाखवून दिलं अशा सुबोनजी देवकाते यांचा इतिहास पुसण्याच पाप पवारांनी केलं असल्याचा आरोप देखील गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर केला.

सुबोनजी देवकातेंना ४५३ गावांची ईनामकी मिळाली होती,त्यात बारामती तालुक्यातील काही गावांचा समावेश होता.त्यामध्ये प्रामुख्याने काटेवाडी या गावाचा समावेश होता.काटेवाडी ही मूळची देवकातेंची आहे.परंतु आता मोगल प्रवृत्तीच्या पवारांनी इथ अनेक गोष्टींमध्ये अतिक्रमण केल असून,बहुजनांच्या इतिहासाचे लचके तोडायचे त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर केला आहे.पवारांनी आतापर्यंत अनेकांच पाणी पळवन असेल, अनेकांच्या जमिनी लाटणे असेल आणि आता इतिहासाचे लचके तोडण्यापर्यंत त्यांची मजल गेली असल्याचा घणाघाती आरोप पडळकरांनी पवारांवर केला.

याच पवारांनी सरदार सुभानजी देवकाते यांच्या समाधीस्थळाच्या बाबतीत छेडछाड करण्याचा प्रकार केला आहे, तर येत्या काळामध्ये सुभानजी देवकाते यांचा उचित स्मारक सरकारच्या माध्यमातुन व्हावं अशी मागणी देखील पडळकरांनी केली आहे. बारामतीत सुरू असलेल्या शिवसृष्टीत शुबोनजी देवकाते यांच्या पुतळ्याचे उचित स्मारक देखील करण्यात यावं अशी मागणी देखील गोपीचंद पडळकर यांनी केली. तसेच त्या परिसरात त्यांच्या जीवन परिचयाचा संपूर्ण इतिहास असणारा बोर्ड या परिसरामध्ये लावण्यात यावा.अशी आग्रही मागणी देखील पडळकर यांनी यावेळी केली. यावेळी पडळकरांसोबत भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा सचिव अविनाश मोटे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. गोविंद देवकाते,बारामती तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे,युवा मोर्चाचे अजित मासाळ,जगदीश कोळेकर,शहराध्यक्ष सतीश फाळके,तालुका उपाध्यक्ष सुधाकर पांढरे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी कोट :

सरदार सुबोनजी बळवंतराव देवकाते यांची समाधी ही कन्हेरीतील मारुती मंदिरातील महादेवाचे मंदिरच आहे त्याचे सर्व पुरावे इतिहासकारांनी दिले असून महादेवाचे मंदिर हेच सरदारांची समाधी आहे हे सिद्ध झाले असून,लवकरच समाधी स्थळावरील जागेवरती सरदार देवकाते याचां जिवनपट, पराक्रमी इतिहास, सर्व माहिती असणारा फलक लावण्यात येणार आहे अशी माहिती ॲड. गोविंद देवकाते यांनी दिली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *