बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भिवंडीमधील सभेत बोलताना,सध्या जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला विसर पडला आहे. तसेच मुस्लिम समाजाचा देखील विसर पडला आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता,यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की “आम्हाला कोणाचाही विसर पडलेला नाही”.आम्ही सगळ्यांची व्यवस्थितपणे काळजी घेतो.असे अजित पवार म्हणाले..
भिवंडीत नवाब मालिकांबाबत काय म्हणाले ओवेसी ?
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सध्या जेलमध्ये असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या निमित्ताने शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार संजय राऊतांसाठी शरद पवार पंतप्रधानांना भेटतात मग नवाब मलिक यांच्यासाठी का नाही ? असा सवाल ओवेसींनी विचारला.यावेळी ते भिवंडीमधील सभेत बोलत होते.मुघलांवरुन मुस्लिमांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही ओवेसींनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार जेव्हा दिल्लीत गेले तेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांनी पंतप्रधान आणि सध्या देशाचे बादशाह होऊन बसलेले नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि संजय राऊतांवर कारवाई करु नका सांगितलं.
त्यांना जेलमध्ये टाकू नका, कारवाई करु नका यासाठी सांगितलं. पण त्यांना नवाब मलिकांची आठवण का झाली नाही ? हे मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना विचारायचं आहे”.असदुद्दीन ओवैसी म्हणाले, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि समाजवादी पक्षातील नेते जेलमध्ये जाणार नाहीत याची ते काळजी घेतात इतर नेत्यांच्या बाजूने उभे राहतात, पण जेव्हा त्यांच्याच पक्षातील मु्स्लिम नेत्यांवर टाच येते ते जेलमध्ये जातात तेव्हा हेच नेते जेलमध्ये गेलेल्या, अडचणीत असलेल्या मुस्लिम नेत्यांकडे दुर्लक्ष करतात त्यांना वाचवण्याचा साधा प्रयत्नही करीत नाही.