Ajit Pawar Speak : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबद्दल माहिती घेऊन तसे आदेश दिले जातील ; बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी करत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना तालुक्यातील कामे दर्जेदार झाली पाहिजेत अशा सूचना देत याबाबत खबरदारी घ्या असे देखील बजावले.यानंतर विद्या प्रतिष्ठान येठे जनता दरबार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला असता, पुण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत.

यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून जनतेला याविषयी सांगितले जाईल,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.कोरोनाच्या व्हेरिएंटविषयी त्यांनी चिंता व्यक्त करत, कोरोनाचा नवा व्हेरिएंटचे पुण्यात रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांना चौकशी करायला सांगितली आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील याबद्दल माहिती घेत आहेत.

सोमवारी या प्रकाराबद्दल माहिती घेतली जाईल.जर ती आपल्या सगळ्या जनतेच्या दृष्टीने गंभीर बाब असेल तर जनतेला पण त्याच्या बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल.आणि काही काळजी घेतली पाहिजे काय खबरदारी घेतली पाहिजे. त्याबद्दल देखील माहिती दिली जाईल असे प्रतिपादन देखील अजित पवारांनी केले आहे.यामुळे नागरिकांनी देखील आता काळजी घेतली पाहिजे असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *