इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
इंदापूर पोलिसांनी घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून १ सियाज कार व १५ मोटरसायकल असा तब्बल १८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.संशयित आरोपी रितेश जितेंद्र विटकर (रा.वडारगल्ली, इंदापुर ) सागर रमेश कोष्टे (रा.साकी विहार रोड,मुंबई ) गणेश महादेव चौगुले,राहुल बाळासाहेब पवार दोन्ही (रा. इंदापुर )यांना ताब्यात घेतले असून, याप्रकरणी स्वप्निल नाझरकर ( रा.श्रीराम हौसिंग सोसायटी,ता.इंदापूर )यांनी फिर्याद दिली होती.
अज्ञात चोरट्यांनी सियाज ही चारचाकी कार नं. MH 42 BB2630 ही चोरुन नेल्याबाबत फिर्याद दाखल होती. तसेच इंदापुर शहरात घरफोडीचे व मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते,या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षकांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश केले असता,या गुन्ह्याचा तपास करीत असताना, या गुन्ह्यामधील घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहीले असता तीन आरोपींचे फुटेज दिसल्यानंतर आरोपींच्या शोधासाठी इंदापुर पोलीसांनी संशयित आरोपी राजेंद्र विटकर व सागर कोष्टे यांना मुंबईतून ताब्यात घेत, गुन्ह्यात चोरीला गेलेली कार जप्त केली.आरोपींना अटक करत, त्यांच्याकडे चौकशी केली असता, आरोपींनी ही चोरी इतर साथीदाराच्या मदतीने केल्याचे कबूल केल्याने इतर दोघांना ताब्यात घेत आरोपींकडुन वेगवेगळ्या ठिकाणांवरुन चोरी केलेल्या १५ मोटार सायकली व १ मारुती सियाज कार तसेच सोन्याचे दागिने असा तब्बल १८ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग मिलींद मोहिते,बारामती उपविभागाचे पोलीस अधिकारी, गणेश इंगळे यांच्या मार्गदशनाखाली इंदापूर पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील,ज्ञानेश्वर धनवे, महेश माने,प्रदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे,सुधीर पाडुळे,संजय धोत्रे,अपर्णा जाधव,सहाय्यक फौजदार सतीश ढवळे, पोलीस नाईक महंमदअली मड्डी, बापू मोहिते,मामा चौधर सलमान खान,माऊली जाधव,आप्पा हेगडे,पोलीस कर्मचारी विशाल चौधर,नरळे,प्रविण शिंगाडे यांनी केली आहे.