बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्षांच्या बंगल्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार घडला असून,शहाजीराव मुगुटराव काकडे (रा.निंबुत,ता. बारामती,जि.पुणे) असे डल्ला मारलेल्या माजी अध्यक्षांचे नाव आहे.त्यांच्या बंगल्यातून सुमारे १३ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत.याप्रकरणी गौतम शहाजीराव काकडे यांनी याबाबत फिर्याद दिली असून,अज्ञात चोरट्यांविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३८० प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,फिर्यादी गौतम काकडे हे कुटुंबियांसह २१ ते २३ मे दरम्यान कोकण दर्शनासाठी गेले असताना,घरातील दागिने हे वडील शहाजी काकडे यांच्या खोलीतील कपाटात ठेवली असता,अज्ञात चोरट्यांनी १ सोन्याची बांगडी व १ सोन्याचा डायमंड असलेली अंगठी चोरल्याचा प्रकार घडला असून,
फिर्यादीच्या घरी त्यांचे कुटुंबीय तसेच नातेवाईक कृष्णराव देशमुख हे एकत्रित राहतात.गेल्या दहा वर्षांपासून एक दांपत्य त्यांच्याकडे स्वयंपाक व घरातील काम करते. तर देशमुख यांच्या देखभालीचे काम एक मुलगा करतो.झालेल्या चोरीच्या प्रकाराबाबत त्यांनी फिर्य़ाद दाखल केली नव्हती. दरम्यान फिर्यादीची बहीण सुट्टीसाठी माहेरी आली असताना त्यांच्या कामासाठी त्यांच्यासोबत एक महिला कामगारही आली होती.
शहाजीराव काकडे यांच्या बेडरुममधील कपाटातून लाॅकरच्या चाव्या गायब झाल्या होत्या.त्यामुळे बेडरुममधून बाहेर पडताना दरवाजा बंद करण्याची दक्षता घेतली जात होती. २१ मे रोजी फिर्यादी हे कुटुंबियांसह पहाटे सहलीला गेले. यावेळी शहाजीराव काकडे व नातेवाईक देशमुख हे घरी होते. कामगारही तेथेच होते. २३ रोजी ते सहलीवरून परतल्या नंतर २४ रोजी फिर्य़ादीच्या आईने त्यांच्याकडील चावीने लाॅकर उघडला असता सहलीला जाताना ठेवलेले दागिने आढळून आले नाहीत.कामगारांकडे विचारपूस केली असता त्यांनीही या प्रकाराबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले. या घटनेत एक लाख रुपयांची दोन तोळे वजनाची सोन्याची बांगडी, १ लाख रुपयांची अंगठी, पाच लाख रुपयांच्या दहा तोळ्याच्या पाटल्या, ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे कंगन, ३ लाख रुपयांच्या सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या असा ऐवज चोरीला गेला असल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे.