Ahilyadevi Holkar Jayanti : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर आणि दीपोत्सवाचे आयोजन..!!


औरंगाबाद : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

धनगर समाज क्रांती मोर्चा तर्फे मागील ५ वर्ष पासून अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अयोजित करण्यात येणाऱ्या तथा धनगर आरक्षणासाठी प्राणाचे बलिदान देणारे प्रेरणास्थान शाहिद मनजित कोळेकर यांच्या कार्याची स्मृती राहावी म्हणून जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३० मे रोजीचा भव्य दीपोत्सव कोरोना च्या लॉकडाऊनमुळे मागील २ वर्ष पासून दीपोत्सव बंद करण्यात आला होता पण आता सर्व परिस्थिती स्तिर झाल्यामुळे यावर्षी अहिल्यादेवी स्मारक कोकणवाडी,औरंगाबाद येथे भव्यदिव्य दीपोत्सव आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मुख्य आयोजक डॉ. संदीप घुगरे यांनी दिली.

धनगर समाज क्रांती मोर्चा आणि जन क्रांती संघ मागील ६ वर्षापासून दरवर्षी नित्यनियमाने पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निम्मित पूर्वसंध्येला औरंगाबाद शहरातील अहिल्यादेवी यांच्या पुतळा समोर भव्य दीपोत्सव,पुष्पहार आणि ३१ मे ला शहरातील सर्व पुतळ्याचे दुधाभिषेक करण्यात येते यासाठी संघटना ला प्रेरणा देणारे शाहिद मनजीत कोळेकर यांच्या कार्याची आठवण आम्हाला या माध्यमातून होते दीपोत्सव साजरा करण्याची सुरुवात त्यांनीच केली होती.

यामध्ये या वर्षी पासून प्रथमच जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर चे आयोजित करण्यात येत आहे या मध्ये विषेश महत्वाचं म्हणजे अहिल्यादेवी यांच्या जयंती चे जे वर्ष असेल तितके रक्तदाते आम्ही संघटना मार्फत एकत्र करण्याचा प्रयत्न करणार आहोत या साठी शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधव, अहिल्यादेवी होळकर प्रेमी,सामाजिक कार्यकर्ते, ओबीसी संघटना,राजकीय नेते,आम्हला सहकार्य करतील अशी अपेक्षा या समितीने केली आहे या जयंती उत्सवाला सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती धनगर समाज क्रांती मोर्चा,जनक्रांती संघाचे वतीने करण्यात आले आहे अशी माहिती संघटना प्रमुख डॉ.संदीप घुगरे यांनी केली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *