Baramati Crime : एम.पी.डी.ए कायद्यान्वये निंबुत मधील अवैध दारू विक्रेता प्रकाश नवले स्थानबध्द..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

बारामती उपविभागातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या संशयित आरोपी प्रकाश चैनसिंग नवले,वय.५२ वर्षे ( रा.निंबुत,ता.बारामती,जि. पुणे ) याच्यावर दारुबंदी कायदयान्वये वेळोवेळी गुन्हे दाखल करुन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली होती.कारवाई करून देखील तो अवैध दारु विक्री बंद करत नसल्याने एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करत १ वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून,तब्बल २० जणांवर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी यादी बनवण्यात आली असून,१५० अवैध दारू विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे.

अवैध दारू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना सांगितले असता,वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या गुन्हे अभिलेखावरील प्रकाश नवले याच्यावर तब्बल २५ दारुबंदी कायदयान्वये गुन्हे दाखल होते,त्यानुसार पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार या प्रस्तावाची पडताळणी करुन नवले याला एम.पी.डी.ए कायदयान्वये १ वर्ष स्थानबध्द करण्याचे दिल्याने ताब्यात घेत येरवडा कारागृहात जमा करण्यात आलेले आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलींद मोहीते उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे,पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक,सोमनाथ लांडे,करंजेपुल दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार,फौजदार जगताप, पोलीस हवालदार महेश बनकर,रमेश नागटिळक,दिपक वारुळे,पोलीस नाईक अमोल भोसले,नितीन बोराडे, पोलीस कर्मचारी महादेव साळुंके,पोपट नाळे, अमोल भुजबळ,महिला पोलीस कर्मचारी प्राजक्ता जगताप यांनी केलेली आहे.

बातमी चौकट :

बारामती उपविभागातील वारंवार अवैध हातभट्टी दारु विक्री करणाऱ्या २० जणांवर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करणेसाठी यादी तयार करण्यात आलेली असुन एकुण १५० जणांवर व इतर अवैध दारु विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे.

गणेश इंगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *