बिग ब्रेकिंग : परिवहनमंत्री अनिल परब यांनी कपड्याची बॅग भरून ठेवावी : किरीट सोमय्या


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

ईडीकडून राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी संबंधिक सात ठिकाणी छापे टाकण्यात आले.परबांच्या विरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती.या प्रकरणात त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा देखील केला असून,आता अनिल परबांवर झालेल्या कारवाईवर किरीट सोमय्यांची देखील प्रतिक्रिया आली आहे.सोमय्या यांनीच परब यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

“अनिल देशमुखानंतर आता अनिल परबांनी आपली कपड्याची बॅग भरून ठेवावी अशा आशयाचा व्हिडिओ रेकॉर्ड करत ट्विट केले आहे”

किरीट सोमय्यांनी अनिल परबांविरोधात दिलेल्या तक्रारीत असे महंटले आहे की,अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता अनिल परब यांचा नंबर लागला आहे.परब यांनी शेकडो कोटींचा घोटाळा केलाय.संजय कदमच्या घरी मोठी कॅश सापडली सव्वा तीन कोटी रोख रक्कम सापडली.उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या माध्यमातून माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
२५ कोटीचे रिसॉट स्वत:च्या नावावर प्रॉपर्टी टॅक्स भरतो पण त्याचा खर्च कोणी केला, बंधकामाचा खर्च कोणी केली

परब यांचे सर्व काळे कारनामे बाहेर येतील.खार पोलिसांकडे माझ्याविरुद्ध तक्रार परबांनी दिली, वांद्रे पोलिसात बोगस FIR त्यांनीच दिली.खार पोलिसांकडे माझ्याविरुद्ध तक्रार परबांनी दिली, वांद्रे पोलिसात बोगस FIR त्यांनीच दिली.संजय पांडे यांनी पोलिस माफियागिरी सुरू केली आहे. ते मुंबई पोलिसांचे नव्हे तर ठाकरे कुटुंबियांचे आयुक्त असल्या सारखे वागत आहेत. त्यांना उत्तर द्यावे लागले.महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे की अनिल परब घोटाळेबाज आहेत.मंत्री असताना सल्लागार म्हणून २५ लाख रुपये खात्यात जमा केले जातात.असे सोमय्यांनी दिलेल्या तक्रारीत महंटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *