पिंपळदरी : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथे चव्हाण हॉस्पिटल आणि धन्वंतरी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिर संपन्न झाले.पिंपळदरी येथे गोरगरीब व गरजू नागरिकांना गोळ्या व औषधाची वाटप मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. परिसरातील अनेक गावकऱ्यांनी या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने हे आरोग्य शिबिर डॉ.कृष्णा चव्हाण व धन्वंतरीं हॉस्पिटलचे डॉ.दीपक अपार जनरल सर्जन यांच्या मार्फत आयोजित करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख देविदास लोखंडे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष कळावंते,भाऊराव लोखंडे, संजय चव्हाण,राजू चव्हाण, सुमनबाई तांगडे, किशोर कळवत्रे,सोसायटीचे सांडू लोखंडे, रामेश्वर नरवाडे,शंकर नरवडे, गोपाळ काळे,आनंद चव्हाण, सुलेमानशेठ, दुर्गदास चव्हाण आदी तरसूत्रसंचालन पत्रकार गणेश कोलते यांनी केले व गावकऱ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला होता.सुमारे ९० ते १०० रुग्णांच्या स्त्री रोग,कुरुप मुतखडा,हायड्रोसिल,गर्वपीसवी व विविध आजारांवर उपचार करण्यात आला.