पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त आहेत. यातील सहाव्या जागेसाठी खासदार संभाजी राजे भोसले प्रयत्नशील आहेत.महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजी राजेंना पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेनेचेखासदार संजय राऊत यांनी विरोध दर्शविला आहे.त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा व छावा संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र समन्वयक अंकुश कदम यांनी सांगितले की,संभाजीराजे यांना विरोध करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक भूमिकेत आहे.
छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष राज्यसभा उमेदवारीला संजय राऊत सातत्याने विरोध करत आहेत. संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिव प्रेमी जनता उतरवेल.छावा संघटनेने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, संभाजीराजे यांनाच का उमेदवारी दिली पाहिजे ? कारण संभाजीराजे यांनी कधीही भाजपच्या कार्यक्रमला हजेरी लावली नाही, दिल्लीत शिवजयंती केली.धर्म पंथ जात पाथ यापलीकडे ते पाहतात.ते कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधित्व घेत नसल्याचे दुखणे विविध पक्षांना आहे.शिवसेनेचा त्यांना शिवबंधन बांधायचा कट आहे,असा आरोप छावा संघटनेने केला आहे.
खासदार संजय राऊत यांचा छावा संघटना निषेध करते. शिवाजी महाराज यांच नाव वापरलं जातं,महाविकास आघाडी यांचे ज्येष्ठ नेते शरद पवारांना हे शोभत नाही. शरद पवार तुमची विश्वासार्हता राहिली नाही. संजय राऊत म्हणतात की ४२ मतं आहेत का ? तुमचे जे ६० – ५० लोक निवडून आलेत ते शिवाजी महाराजांमुळे,अशी टोलाही छावा संघटनेने लगावला आहे.आम्ही दोन दिवस वाट बघू अन्यथा थेट वर्षा,अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या घरी चाल करून जाणार आहोत.शिवाजी महाराजांच्या वंशाजला त्यांनी पाठिंबा दिला नाही तर आम्ही बघू,अशा इशाराही छावा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.