Gopichand Padalkar Speak : अजित पवार आज सत्तेत आहेत, उद्या ते सत्तेत नसतील उद्या सरकार बदलल्यावर तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही, पडळकरांनी कोणाला दिला हा ईशारा ?


पुरंदर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज्यसरकारच्या विरोधात पुरंदर तालुक्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना पडळकर म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्य सरकार त्यावर काहीही करायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत सरकारला धारेवर धरले म्हणून यांनी वीज कनेक्शन तोडणी तात्पुरती थांबवली आहे.मात्र राज्यात लोडशेडिंग सुरूच आहे. आठ-आठ तास भारनियमन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

पुरंदर तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतातून २२० केबीची लाइन जाते.यात राष्ट्रवादीचे काही दलाल असून ते या सर्वांना पाठीशी घालत आहेत. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत.सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बागायत शेतातून या टॉवरची लाइन टाकायचे चालू आहे. या सर्वांचा विरोध म्हणून आम्ही तहसील कार्यालयावर मोर्चा काढत असल्याचे पडळकरांनी सांगितले.यावेळी पडळकरांनी पवारांवर टीका केली.बारामतीचा विकास झाला की नाही,यावर बोलताना पडळकर म्हणाले की,शरद पवार पाहुण्यांना दुसऱ्या रस्त्याने घेऊन जातात आणि विकास झाला,असे सांगतात,असा आरोप पडळकरांनी केला.

शरद पवारांनी बारामती तालुक्यातील काही गावांना जाणीवपूर्वक पाणी दिले नाही नाही.बारामतीच्या ४२ गावांना पाणी नाही, असे ते म्हणाले. बारामतीतील या पवारांचे ऐकणारे राज्यात असे अनेक प्रांत आहेत. अजित पवार आज सत्तेत आहेत, उद्या ते सत्तेत नसतील.उद्या देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही,असा घणाघात त्यांनी केला.महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणाचा खून करायचा होता, तो त्यांनी केला आहे. ओबीसी आयोगाला पैसे दिले नाहीत. इतके दिवस सरकार झोपा काढत होते का, असा सवाल करत सरकारमधील काही लोकांना ओबीसींच्या जागा बळकावयाच्या आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकरांनी सरकारवर केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *