Petrol-Diesel Prices | राज्य सरकारचा मोठा निर्णय पेट्रोल २.८ रुपयांनी तर डिझेल १ रुपयांनी स्वस्त..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज २२ मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.

मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता ८० कोटी रुपये महिन्याला आणि १२५ कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पंन कमी होणार आहे. १६ जून २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ७ रुपये ६९ पैसे आणि १५ रुपये १४ पैसे प्रती लिटर कर आकारात होते.

मार्च आणि मे २०२० मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे १३ आणि १६ रुपये अशी वाढ केली होती.केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारांवर याबाबत दबाव वाढला होता दरम्यान केरळ सरकारने देखील सामान्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकारने सामान्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेताला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *