इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
गाईच्या दुधाला राज्य सरकारने किमान पन्नास रुपये लिटरला दर द्यावा अशी मागणी करत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्याचे माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी गाईची दुधाची धार काढत ही मागणी केली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात चिखली गावामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत दुधाला वाजवी दर सरकारने द्यावा अशी मागणी केलीय..लिटरला शंभर रुपये जरी दर दिला तरी परवडेल मात्र मी राज्य सरकारला अतिशयोक्ती मागणी करणार नाही तरी त्यांनी किमान पन्नास रुपये तरी दुधाला दर करावा.
पेंड तसेच चारा देखील महागला असून त्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे कमी मिळतात. शेतीला जोड धंदा म्हणून दुधाचा व्यवसाय शेतकरी करून हा उद्योयप्रिय होईल. शेतकर्यांवरती कर्जबाजारीपणाची वेळ देणार नाही.त्यांचे प्रपंच सुधारून मुले देखील उच्चशिक्षित होतील.राज्याचे मुख्यमंत्री, दुग्ध विकास मंत्री,उपमुख्यमंत्री यांना विनंती करत मी देखील दूग्ध विकास मंत्री होतो याची आठवण करून देत गायीची धार काढत ही मागणी केलीय..