Ajit Pawar Speak : पेट्रोल डिझेल दर कपात केली हे चांगलंच…मात्र जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पुन्हा इंधन दरवाढ वाढेल अशी वेळ केंद्राने आणू नये : उपमुख्यमंत्री अजित पवार


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे केंद्र सरकारवर जनतेचा रोष वाढत असल्याने,केंद्र सरकारने दर कपात केली आहे.मात्र हे दर तसेच कमी राहावेत,अन्यथा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने पुन्हा इंधन दर वाढवले असे होऊ नये एवढीच अपेक्षा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हटल आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी बोलताना पवार म्हणाले, देशभरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर नाराजी होती.

त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. मात्र असे असले तरी देखील हे दर अशीच कायम कमी राहावेत, अन्यथा पुन्हा त्याच स्थितीवर हे दर आले,तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही.पेट्रोल डिझेलचे दर हे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेले होते.राज्य सरकारने सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल गॅसचे दर परवडत नसल्याने कुठलाही टॅक्स न घेण्याचा निर्णय घेतला.इंधन दरवाढ गॅस दरवाढीसंदर्भात अनेक ठिकाणी आंदोलने झाली. यामुळे इंधन दरवाढ कमी केलेली असावी सुरुवातीला अगोदर पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवायच्या आणि नंतर कमी करायचा असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

तेलाच्या किमती वाढवण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला असल्याने,केंद्र सरकार या तेलाच्या किमती वाढवते किंवा कमी करते.सरकार कोणतेही आले असले तरी गोरगरीब जनतेला संसार चालवायला परवडले पाहिजे अशी परिस्थिती सरकारने निर्माण केली पाहिजे, असेही अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.राज्य सरकारने यापूर्वीच हे दर कमी केले आहेत राज्य सरकारने त्यांचा कर कमी करताना सर्वसामान्य माणूस टॅक्सी चालक वाहन चालक या सर्वांचा विचार केला आणि एक हजार कोटींचा बोजा सहन करत यापूर्वीच सीएनजीचा दर कमी केले मात्र हे दर पुन्हा वाढले असल्याचेही पवार यांनी सांगितले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *