बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बारामती तालुक्यातील विकास कामांचा आढावा व बैठक घेऊन झाल्यानंतर विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी पत्रकारांशी बोलत असताना,पत्रकारांशी बोलताना पत्रकारांनी राज ठाकरे यांनी शरद पवार हे बाळासाहेब ठाकरेंची आपल्या भाषणातून क्रेडिट ब्लिटी घालवत आहेत यावर उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांवर भडकले हे तुमचे असले धंदे बंद करा हे असे महंटले ते तसे महंटले त्यांबद्दल तुमचं मत काय जे म्हणायचे आहे ते त्यांनी म्हणावे.. आम्हाला विकासाबद्दल बोलायच आहे.
तसेच अजित पवार म्हणाले की,मी काल पण जळगाव किंवा शहापूर असेल किंवा तिकडे डहाणू असेल किंवा ज्या ज्या भागात मी गेलेलो होतो तिथे माझी भूमिका ही विकास कामांचीच असेल..त्यामुळे तुम्ही पत्रकारांनी सुद्धा हे असले धंदे दाखवायचे बंद करा.. यावर अजित पवार हे पत्रकारांवर जोरदार भडकले आणि ज्यातून आपल्या महाराष्ट्रातील मुलांना मुलींना रोजगार निर्माण होणार आहे.त्याच्यातून जातीय सलोखा निर्माण होणार आहे. ज्याच्यातुन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याकरता पोलीस वर्गाला मदत होणार आहे ह्या गोष्टीला आपण जास्त म्हणत्व दिल पाहिजे.