लहानपणापासून मला नृसिंहाची ओढ
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेञ निरा नरसिंहपूर (ता. इंदापूर ) येथे प्रसिद्ध श्री लक्ष्मी-नृसिंहाचे शुक्रवारी (दि.२०) दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते श्री नृसिंहाची विधिवत पूजा व आरती करण्यात आली.श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिर हे देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे. भीमा व नीरा नदीच्या संगमावरती वसलेले श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर हे दक्षिणेकडील काशी म्हणून ओळखले जाते.
मी लहानपणापासून येथे दर्शनासाठी येत आहे. माझी आज्जी सांगायची की आंम्ही होडीतून नीरा नदी पार करून दर्शनासाठी येत असू, असे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. याप्रसंगी भाजप नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेसह विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर,आ.राहुल कुल, आ. राम सातपुते, पृथ्वीराज जाचक, रंजनकाका तावरे, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, अंकिता पाटील-ठाकरे, हनुमंतराव सूळ, धैर्यशील मोहिते-पाटील आदीसह देवस्थानचे विश्वस्त, भाजपचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.