झारगडवाडी : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यातील झारगडवाडीतील युवक विहिरीत पोहण्यासाठी गेला असता त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रशांत रामभाऊ घाळे ( वय ३२ ) रा. झारगडवाडी, ता. बारामती, जि.पुणे असे या युवकाचे नांव आहे.कालच त्याच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला आहे.. आणि आज दुसऱ्या दिवशी भाच्यांना पोहण्यासाठी गावातीलच विहिरीवर गेला होता.. अगोदर मयत प्रशांत याने विहिरीत कुस्ती मारली मात्र तो बराच वेळ बाहेर आलाच नाही म्हणून भाच्यांनी घरी येऊन आरडाओरड केली.
त्यानंतर घरातील आणि गावांतील तरुणांनी त्याला बाहेर काढले त्यांच्या कपाळाला गंभीर जखम झाल्याचे दिसून आले त्याला ॲम्बुलन्स मधून खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, सहा वर्षांची मुलगी, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.त्याच्या अशा जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.याबाबत अधिक तपास बारामती तालुका पोलिस करीत आहेत.
बातमी चौकट :
उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढल्याने अनेक जण पोहण्यासाठी विहिरीवर, तलावात, धरणात, नदीवर जात असतात.दोन दिवसांपूर्वी भाटघर धरणात पोहण्यासाठी पाच महिला गेल्या होत्या या पाचही महिलांचा बुडून मृत्यू झाला आणि आज बारामतीतील युवकाचा मृत्यू झाला आहे. पोहण्यासाठी गेल्यानंतर अशा अनेक घटना वारंवार घडत आहेत यामुळे नागरिकांनी पोहताना दक्षता घ्यावी असे आव्हान बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी नागरिकांना केले आहे..