पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला पायी जात असताना, दुचाकीवरून एकाने महिलेच्या गळ्यातील तब्बल ५ लाख ४० हजारांचे १२ तोळ्यांचे मंगळसूत्र चोरीस गेल्याची घटना घडली होती.पौड पोलीस ठाण्यात शुभांगी सचिन साळुंखे, वय.३८ वर्षे (रा.शेळकेवाडी, घोटावडे ) यांनी फिर्याद दिली होती. याप्रकरणी अरमान प्रल्हाद नानावत,वय.२२ वर्षे ( रा.पेरणे फाटा,जि.पुणे ) याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जात असताना,गाडीवरून येणाऱ्या अज्ञात दोघांनी महिलेच्या गळ्यातील १२ तोळे सोन्याचे मंगळसूत्र ५ लाख ४० हजारांचे जबरदस्तीने ओढून चोरी केल्याबाबत गुन्ह्याचा तपास करीत असताना,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस कर्मचारी धिरज जाधव यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा सराईत चोरटा असून, सापळा रचत त्याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असता,त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा आपल्या मित्राबरोबर केला असल्याचे सांगीतले. आरोपीकडे गुन्हयात वापरलेली गाडी मिळून आली असून,आरोपीला गाडीसह पौड पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे.या आरोपीवर या अगोदर लोणीकंद, वाकड,चंदननगर पोलिस स्टेशन येथे जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपीकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख , अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे,पोलीस उपअधीक्षक भाऊसो ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके,पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,पोलीस उपनिरीक्षक अमित सिद पाटिल,पोलीस हवालदार विजय कांचन,राजू मोमीन,पोलीस नाईक अमोल शेडगे, बाळासाहेब खडके,पोलीस कर्मचारी धिरज जाधव,दगडू विरकर,महिला पोलीस कर्मचारी पुनम गुंड यांनी केलेली आहे.