Baramati News : हिंदु शेगर धनगर समाज सेवा महासंघाच्या वतीने २२ मे ला १९ व्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन..!!


हा सामुदायिक सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पडणार पार..

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

हिंदु शेगर धनगर समाज सेवा महासंघ महाराष्ट्र राज्यतर्फे १९ वा सामुदायिक विवाह सोहळा माळेगांव कारखान्याचे शिवतीर्थ मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे.अनिष्ठ हुंडा पद्धती आणि लोकभावनेतील प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी कर्जबाजारी होवून लग्नावर केला जाणारा अवाढव्य खर्च या चक्रातून सुटका व्हावी,या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रविवार २२ मे २०२२ रोजी सायं. ४ वा. १७ मि.या शुभ मुहूर्तावर सामुदायिक विवाहाचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत या महासंघाच्या वतीने जवळपास १२०० जोडप्यांचे विवाह सोहळे पार पडले आहेत.

या विधायक उपक्रमास आपल्या शुभेच्छा लाभाव्यात. तसेच या लोककल्याणकारी सामुदायिक विवाह चळवळीस बळकटी यावी म्हणून प्रत्यक्ष सहभागी झालेल्या वधु-वरांना आशिर्वाद देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, तसेच परिसरातील साखर कारखान्यांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुनिल भगत, अध्यक्ष व भारत पाटील कार्याध्यक्ष, अॅड. गुलाबराव गावडे,अनंता रोटे सर यांनी केले आहे.

बातमी चौकट :

गेली दोन वर्षे कोरोनाचा काळ असल्याने अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या अनेकजणांचे व्यवसाय मोडीत निघाले. मुलामुलींच्या लग्नाला होणारा खर्च हा अवाढव्य असतो तो खर्च करणे शक्य होत नाही. यामुळे आम्ही गेली १९ वर्षांपासून या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत आहोत.याचा फायदा गोरगरिबांना होत असल्याचे देखील आम्हाला समाधान आहे असे मत या महासंघाचे संयोजक भारत गावडे यांनी आपल्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *